जिल्ह्यात‍ ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत साडेतीनशेने घट; दिवसभरात एक हजार ७२८ कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Sunday, 27 September 2020

यातून आत्तापर्यंत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७१ हजार ७२१ झाला आहे. यापैकी ६३ हजार ९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार २९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. सद्यःस्थितीत सात हजार ३२९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात‍ पुन्‍हा एकदा बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या ही नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा अधिक राहिली. शनिवारी (ता.२६) दिवसभरात एक हजार ४२४ बाधित आढळून आले. तर एक हजार ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र वीस जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत साडेतीनशेने घट झाली. 

सात हजार ३२९ बाधितांवर उपचार सुरू

दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ८७८, नाशिक ग्रामीणचे ४९५, मालेगावचे ३३, तर जिल्‍हाबाह्य १८ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ३८४, नाशिक ग्रामीणचे ३२२, मालेगावचे ४३, तर जिल्‍हाबाह्य नऊ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात मृतांमध्ये नाशिक शहरातील दहा, तर नाशिक ग्रामीणच्‍या दहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून आत्तापर्यंत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७१ हजार ७२१ झाला आहे. यापैकी ६३ हजार ९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार २९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. सद्यःस्थितीत सात हजार ३२९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

एक हजार ७९१ अहवाल प्रलंबित

दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात दोन हजार २०३ संशयित, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात १५६, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात २७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३, तर जिल्‍हा बाह्य रुग्णालयात चार संशयित दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७९१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार २५२ नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अडीच लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण 

जिल्ह्यात आत्तापर्यंत अडीच लाखांहून अधिक रुग्णांची स्‍वॅब चाचणी करण्यात आली. शनिवारपर्यंत एकूण दोन लाख ५३ हजार १७३ रुग्णांची स्‍वॅब तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ हजार ७२१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, हे प्रमाण २८.३३ टक्‍के आहे. तर एक लाख ७९ हजार ६६१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. आत्तापर्यंत झालेल्‍या चाचण्यांपैकी सर्वाधिक एक लाख ७७ हजार ५८३ चाचण्या नाशिक महापालिका हद्दीत झाल्या. यापैकी ४८ हजार ७७८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एक लाख २८ हजार ८०५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease corona active patients by three and a half hundred in nashik marathi news