धोक्‍याची घंटा..पुन्हा एकदा गर्भात कुसकरल्या जाताएत कळ्या.. जिल्ह्यात लेकींच्या जन्मदरात चक्क 'इतकी' घट.. 

save girl 1.jpg
save girl 1.jpg

जिल्ह्यात एका वर्षात लेकींच्या जन्मदरात सहाने घट 

आठ वर्षांत हजारामागे मुली जन्माचे प्रमाण 899 वरून 969 पर्यंत 

नाशिक / लखमापूर : महापालिका क्षेत्रात जन्म झालेल्या बाळांची नोंद महापालिकेत होते. त्यांच्या जन्मदराच्या प्रमाणात दोन ते तीन टक्‍क्‍यांच्या फरक पडतो, अशी वैद्यकीयची तांत्रिक माहिती आहे. तरीही जिल्ह्यातील मुलींचे जन्म कमी होणे, ही बाब आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा गर्भात कळ्या कुसकरल्या जात आहे याचेच हे संकेत आहेत.

पुन्हा पावले टाकली नाहीत, तर...

जिल्ह्यातील 2011 मध्ये असलेला मुलींच्या जन्माचा दर हजारामागे 899 इतका होता. मात्र, भ्रूणहत्येच्या वाढलेल्या प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करून हेच प्रमाण 2018-19 पर्यंत 969 पर्यंत वाढविण्यात यंत्रणेला यश आले असताना, गेल्या एका वर्षात पुन्हा एकदा मुलींच्या जन्माचे प्रमाण सहाने 963 इतका खाले आले आहे. गेल्या वर्षातील मुलींच्या जन्मातील ही घट म्हणजे धोक्‍याची घंटा असून, त्यासाठी पुन्हा पावले टाकली नाहीत, तर घसरणीला लागलेला मुलींच्या जन्मदर नियंत्रणात येणे मुश्‍कील होईल. 

चिंताजनक...जन्मदर घटला
आदिवासीपट्ट्यांत लेकींच्या जन्माचे स्वागत होत असताना अवर्षणप्रवण क्षेत्राप्रमाणे द्राक्षे-कांद्याची शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवडमधील मुलींच्या जन्माचा दर 970 वरून एक हजार दोनपर्यंत पोचला आहे. सर्वाधिक एक हजार 18 इतका जन्मदर पेठ तालुक्‍यात आहे. मात्र, दोन वर्षांतील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण पाहिल्यावर धक्का बसावा अशी स्थिती आहे. चांदवडप्रमाणे देवळा, नांदगाव, कृषिपंढरी निफाड, दुष्काळी सिन्नर तालुक्‍यातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या आदिवासी बहुल तालुक्‍यातील मुलींचे प्रमाण कमी राहिले. मालेगाव, येवला आणि नाशिक तालुक्‍यात मुलींचा जन्मदर घटला आहे. 

पुन्हा एकदा गर्भात कळ्या कुसकरल्या जाताएत
मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात जन्म झालेल्या बाळांची नोंद महापालिकेत होते. त्यांच्या जन्मदराच्या प्रमाणात दोन ते तीन टक्‍क्‍यांच्या फरक पडतो, अशी वैद्यकीयची तांत्रिक माहिती आहे. तरीही जिल्ह्यातील मुलींचे जन्म कमी होणे, ही बाब आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा गर्भात कळ्या कुसकरल्या जात आहे याचेच हे संकेत आहेत. 15 तालुक्‍यांपैकी 14 तालुक्‍यांमध्ये मुलींचा जन्मदर 911 हून अधिक आहे. प्रत्येक तालुक्‍यात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण किमान 911 राहिले आहे. पेठ आणि चांदवड तालुक्‍यामध्ये एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत मुलांपेक्षा मुली जन्माला येण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. पेठमध्ये बाराशे मुले, तर एक हजार 222 मुली जन्माला आल्या. म्हणजेच मुलांपेक्षा 22 मुली अधिक जन्माला आल्याने दरहजारी मुलांमागे येथील मुलींचा जन्मदर एक हजार 18 नोंदविला गेला. जिल्ह्यात सर्वाधिक चांदवड तालुक्‍यातही पाच हजार 799 मुले, तर पाच हजार 808 मुली जन्माला आल्या. जिल्ह्यात एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत 33 हजार 185 मुले आणि 32 हजार 169 मुली जन्माला आल्या. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या वर्षभरात 37 हजार 705 मुले आणि 36 हजार 307 मुली जन्माला आल्या.

जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर (एक हजारामागे) 

तालुके    वर्ष 2018-19   वर्ष 2019-20 

बागलाण     919                    993 
चांदवड      970                    1002 
देवळा        927                    955 
दिंडोरी       992                    964 
इगतपुरी     959                    931 
कळवण     1008                  992 
मालेगाव     992                    953 
नांदगाव     986                    987 
नाशिक     1031                  940 
निफाड      959                   983 
पेठ           880                  1018 
सिन्नर        985                   887 
सुरगाणा     948                  911 
त्र्यंबकेश्‍वर  963                  913 
येवला        962                   954 

मुलींवर प्रेम करणारा तालुका अव्वल
पेठ तालुक्‍यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी तालुक्‍यातील आशा कार्यकर्त्या व तालुक्‍याची आरोग्यसेवे मोठे योगदान आहे. मुलींवर प्रेम करणारा तालुका असल्याने मुलींच्या जन्मदरात तालुका अव्वल आहे. यापुढेही हा प्रथम क्रमांक ठेवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाईल. - डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, पेठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com