"खोटे गुन्हे मागे घ्या" पोलिसांच्या नोटीसमुळे "त्यांना' दुसरी नोकरीही गमावण्याची वेळ! 

police mah.jpg
police mah.jpg

नाशिक : शासनाच्या विसंगत नियमांमुळे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाच्या परीक्षेत एमपीएससीद्वारे निवड होऊनही अपात्र ठरविलेल्या 118 उमेदवारांनी तत्कालीन महसूलमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आहे. या उमेदवारांना पाच-सहा दिवसांपूर्वीच पोलिसांत हजर राहण्याच्या नोटीस बजावल्याने या उमेदवारांवर आपली दुसरी नोकरीही गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा संघटक कुणाल ठाकरे यांनी निवेदन दिले आहे. 

कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन केले नाही..तरीदेखील..

2017 मध्ये या उमेदवारांनी एमपीएससीद्वारे परीक्षा दिली होती. परंतु शासनाचे नियम सुसंगत, तसेच स्पष्ट नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यातील निकालाने 118 उमेदवारांना उत्तीर्ण असूनही अपात्र ठरविले होते. त्यामुळे या उमेदवारांनी आपली बाजू मांडण्यासाठी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली होती. त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन केलेले नव्हते, तरीही मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले होते.

"अंत न बघता हे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे" 

आता चार-पाच दिवसांपूर्वी पोलिसांत हजर राहण्याच्या नोटिसा मिळाल्याने त्यांचे धाबे दणाणले असून, मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत अपात्र ठरविल्याने या उमेदवारांनी दुसऱ्या परीक्षा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळविल्या आहेत. मात्र या दुसऱ्या नोकरीसाठी पोलिस पडताळणी झाल्यास त्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. त्यामुळे शासनाने आधीच त्यांची नोकरी घालविली. आता मात्र दुसऱ्या नोकरीवरही खोट्या गुन्ह्यांमुळे अडचणीत येण्याची वेळ आल्याने या उमेदवारांसह त्यांचे कुटुंबीय मोठा मनस्ताप सहन करीत आहेत. शासनाने त्यांचा अंत न बघता हे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांनी संबंधित सर्व मंत्र्यांकडे केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com