मुळशी पॅटर्न स्टाईल रात्रभर "भाईचा बर्थडे"! नांगरे-पाटलांची काय असेल भूमिका?

bhai ka bday 1.jpg
bhai ka bday 1.jpg

नाशिक : भाईचा बर्थडे, वाजले बारा...रं रर रर रर खतरनाक...रात्रभर वाढदिवसाची धूऽऽम... अन् वाढदिवसाला चक्क राजकीय नेत्यांनीही हजेरी...या सर्व गोष्टींमुळे हा वाढदिवस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष असलेल्या वादग्रस्त नेत्याचा मुळशी पॅटर्न स्टाईल वाढदिवस.. अन् त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत भाईचा बर्थडे गाण्यावर उपस्थितांचे थिरकणे. आता यात मूळ गोष्ट म्हणजे रात्रभर सेलिब्रेट करणाऱ्या बर्थडेवर शहराचे पोलिस आयुक्त तसेच युथ आयकॉन विश्‍वास नांगरे-पाटील कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड प्रशांत खरात याने नुकताच आपला बर्थडे चित्रपटांच्या दृष्यंनाही लाजवेल अशा मोठ्या जल्लोषात व धुमधडाक्‍यात साजरा केल्याच्या चर्चेने चांगल्या चांगल्या च्या भुवया उंचावल्या आहेत.

डिजेसाठी रात्री दहाची वेळ असते याचाही विसर.

मुळशी पॅटर्न चित्रपटातील या दृश्‍याचे प्रत्यंतर नुकतेच अंबड परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या वाढदिवसानिमित्त बघायला मिळाले. जालना येथील मूळ रहिवासी असलेले खरात यांना अंबड औद्योगिक परिसरातील गौतम नगर परिसरात त्यांचे समर्थक त्यांना युवक हृदय सम्राट असेही म्हणतात. मार्शल ग्रुप या संघटनेचे ते नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांना साडी वाटप झाले. त्यासाठी परिसरात राजकीय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्री, नेत्यांची छायाचित्रे असलेले होर्डींग्ज लावण्यात आली होती. वाढदिवस सुरु झाल्यावर उत्साही कार्यकर्त्यांनी मूळशी पॅटर्न सिनेमातील भाईचा बर्थडे गाण्यावर ठेका ठरला. उत्साही कार्यकर्त्यांना ते गाणे एव्हढे भावले की रात्री उशीरापर्यंत ते वाजत राहिले. कार्यकर्ते दंग होऊन नाचत राहिले. त्यात सगळ्यांनाच वाद्यवृंद, डिजे यांच्यासाठी रात्री दहाची वेळ असते याचाही विसर पडला.

त्यावर हरकत कोण घेणार?

विशेष म्हणजे त्यासाठी ना पोलिसांची परवानगी घेतली होती.. ना कोणी हरकत घेण्याचे धाडस केले. संबंधीत नेत्याचा परिसरात दराराच एव्हढा आहे की, त्यावर हरकत कोण घेणार? याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणापासून पोलिस ठाणे अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. कायदा- सुव्यवस्थेविषयी लोकप्रतिनिधी, नागीरकांकडून पोलीसावर निवेदन, तक्रारींचा पाऊस पडत आहे. संबंधीत नेता पोलिसांनाही चांगला परिचीत आहे कारण तो त्यांचा पाहुणचार घेऊन आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com