Lockdown : घरच्या ओढीने काठीचा आधार घेत 'या' पठ्ठ्याने कापले अडीचशे किलोमीटरचे अंतर!

abhimanyu varma.jpg
abhimanyu varma.jpg

नाशिक : (दिक्षी) लॉकडाउनमध्ये राज्यात कामाकरिता आलेल्या परप्रांतीय कामगारांचे काम बंद झाल्याने त्यांना गावाकडे जाण्याशिवाय कुठलाच पर्याय नसल्याने अनेकांनी गावाकडे कूच केले आहे. अशातच मुंबईत मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा दिव्यांग अभिमन्यू वर्मा याने पायीच गावी जाण्याचा निर्णय घेत 240 किलोमीटरचे अंतर कापून पिंपळगावपर्यंत पोचला आहे. 

240 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला पार

मूळचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील अभिमन्यू वर्मा अनेक दिवसांपासून मुंबईत कामानिमित्त राहत होता. त्याचा काही वर्षांपूर्वी रस्ता ओलांडताना अपघात झाल्याने त्याच्या पायास दुखापत होऊन काहीसे अपंगत्व आले. यानंतर 24 मार्चपासून लॉकडाउन लागू झाल्याने त्याचे काम बंद झाले. 14 एप्रिलला लॉकडाउन संपेल या अपेक्षेने अभिमन्यू मुंबईतच थांबला. पण 3 मेपर्यंत लॉकडाउनची मुदतवाढ झाल्याने, तसेच हातातील काम बंद झाल्याने अभिमन्यू वर्माने अखेर आपल्याजवळील सर्व धान्य आणि पैसे संपल्याने मूळ गावी पायी निघाला आहे. मुंबईहून 240 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत पार करीत प्रयागराजकडे निघाला आहे. हातातील काठी टेकत टेकत आणि रस्त्याने मिळेल ते जेवण घेत तो आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे. 

गावी पोचण्याची जिद्द मनाशी धरली

सध्या अभिमन्यू निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंतपर्यंत पोचला असून, अजून त्याला गावी पोचण्यासाठी साधारणत: एक हजार 200 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. एप्रिल महिन्यातील रणरणत्या उन्हात तसेच एका पायाने अपंग असा रस्त्याने पायी प्रवास, राहण्याची, जेवणाची सोय नसतानाही आपल्या गावी पोचण्याची जिद्द मनाशी धरली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये काम करीत आहोत. मात्र लॉकडाउनमुळे मूळगावी जावे लागत आहे. खिशातील पैसाअडका संपला म्हणून कशाचीही पर्वा न करता पायी प्रवास करून पोचण्याचा ध्यास घेतला आहे. - अभिमन्यू वर्मा (कामगार) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com