महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे...'मॉलिक्‍युलर लॅबला तातडीने मंजुरी द्यावी'

sa.jpg
sa.jpg

नाशिक : नाशिक उत्तर महाराष्ट्राचे विभागीय ठिकाण असल्यामुळे शहरात मॉलिक्‍युलर लॅब आवश्‍यक आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राज्यांना निधी मिळतो. त्या निधीतून नाशिकमध्ये राज्य शासनाने त्वरित मॉलिक्‍युलर लॅब मंजूर करावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

मॉलिक्‍युलर लॅब अत्यंत आवश्यक

महापौर कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासन व पोलिस आयुक्त कार्यालयाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परिणामी शहरात कोरोना नियंत्रणात आहे; परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच शेजारच्या जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण दाखल होत असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव भागातील आहेत. शहरात दाखल होत असलेल्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले जातात. अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासही विलंब होतो. नाशिक उत्तर महाराष्ट्राचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे मॉलिक्‍युलर लॅब अत्यंत गरजेची आहे. यातून तातडीने तपासणी अहवाल प्राप्त होतील, त्यानुसार उपचार करणे सोपे जाणार आहे. 

मॉलिक्‍युलर लॅबला तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी महापौर कुलकर्णी यांनी केली. त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनीही प्रस्ताव तयार करून महासभेच्या मान्यतेने राज्य शासनाला पाठविण्याची सूचना केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com