रेल्वे बंदमुळे दिव्यांग विक्रेत्यांची फरफट; करावे लागतेय मिळेल ते काम 

युनूस शेख
Thursday, 3 December 2020

सध्या जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. प्रत्येक जण या महामारीच्या काळात स्वतःचा रोजगार वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे तरीही या काळात अनेकांची नोकरी गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न गंभिर झाला. दरम्यान रेल्वे बंद झाल्याने अपंग विक्रेत्यांची देखील अशीच फरपट होत आहे. 

जुने नाशिक :  सध्या जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. प्रत्येक जण या महामारीच्या काळात स्वतःचा रोजगार वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे तरीही या काळात अनेकांची नोकरी गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न गंभिर झाला. दरम्यान रेल्वे बंद झाल्याने अपंग विक्रेत्यांची देखील अशीच फरपट होत आहे. 

उच्च शिक्षीत रामेश्वरचा संघर्ष

उच्च शिक्षीत दिव्यांग (दृष्टीहीन) रामेश्‍वर जाधव यांचा कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरु आहे. बी.ए पदवी नंतर गेल्या तीन वर्षापासून उदरनिर्वाहसाठी रेल्वेत खेळणी विक्री केली. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद झाल्याने व्यवसाय गेला. त्यानंतर मिळेल ते काम केले. सद्या दिनदर्शीका विक्रीतून उपजीवीका भागविली जात आहे. त्यांच्या अन्य ९ जणाना असाच संघर्ष करावा लागत असल्याचे रामेश्‍वर याने सांगीतले. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

अधिकारी बनायचे त्याचे स्वप्न

रामेश्‍वर उच्चशिक्षीत असल्याने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे त्याचे स्वप्न आहे. बॅकींग, रेल्वे, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध प्रकारच्या परिक्षा देत आहे. कुटूंबाच्या उदरनिर्वाह भागविण्याची जबाबदारी असल्याने त्याच्याकडून मिळेल ते कामे केली जात आहे. गेली तीन वर्ष त्याने रेल्वेमध्ये खेळणी विक्रीचा व्यवसाय केला. जरा बरी कमाई होत असतांनाच, कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. रेल्वे सेवा बंद झाली. रेल्वेतील खेळणी विक्रीचा व्यवसाय बारगळला. घरात बसून चालणार नसल्याने कपडे विक्रीचा व्यवसाय केला. नवीन वर्षाच्या दिनदर्शीका विक्रीस आल्या आहे. त्यानिमित्ताने रामेश्‍वरसह रेल्वेत खेळणी विक्री करणारे त्याचे अन्य नऊ मित्र शहराच्या विविध भागात दिनदर्शीका विक्रीचा व्यवसाय करत आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

सरकारने दिव्यांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे. त्याना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. जेणे करुन त्याना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तसेच सद्यातरी आम्हाला पुन्हा रेल्वेत खेळणी विक्रीची परवानगी द्यावी. 
रामेश्‍वर जाधव (दिव्यांग) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disabled vendors are facing difficulties as the railways are closed nashik marathi news