'गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३४० कोटी रुपयांनी अधिक पीककर्ज वाटप' - जिल्हाधिकारी

suraj m.jpg
suraj m.jpg

नाशिक : पीककर्ज वाटपाचे यंदा तीन हजार ३०३ कोटींच्या उद्दिष्टापैकी एक हजार ८०७ कोटींचे वाटप झाले. गेल्या वर्षी तीन हजार १४७ कोटींच्या उद्दिष्टांपैकी एक हजार ४६७ कोटी इतकेच कर्जवाटप झाले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३४० कोटी रुपयांनी अधिक पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महिन्यापासून पीककर्ज वाटपासाठी पुढाकार घेत नियमित बैठका घेतल्याने हे शक्य झाले.

गतवर्षापेक्षा ३४० कोटी अधिक कर्ज 

पीककर्ज वाटपासाठी दर आठवड्याला नियमितपणे तालुकानिहाय आढावा बैठका घेत, पीककर्ज वितरणाचा आराखडा केला होता. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्वाधिक उद्दिष्टे दिलेल्या मुख्य दहा बँकांनी आतापर्यंत एक हजार ६१० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटले. मुख्य दहा बँकांची पीककर्ज वाटपाची टक्केवारी ६३ टक्के असून, इतर बँकांनी तत्परतेने कर्जवाटप केले. बँक ऑफ महाराष्ट्र ६५ टक्के, ‘एनडीसीसी’ने सर्वसाधारण कर्जवाटप ३३६ कोटीपर्यंत केले आहे. तर इतर बँकांनीदेखील खूप चांगल्या प्रकारे कर्जवाटप केले आहे. अशाप्रकारे जास्त उद्दिष्टे असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक व ज्यांचे २०० कोटींपेक्षा जास्त उद्दिष्टे आहे, अशांनी चांगल्या प्रकारे काम केल्याने हे शक्य झाले. 

शेतकरी कर्जमुक्ती योजना एक महत्त्वाकांक्षी योजना 

कर्जमुक्तीतून २४५ कोटी रुपयांचे कर्जवाटप महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागच्या वर्षी ज्या लोकांचे कर्ज थकीत होते, त्यांचे कर्ज शासनाने फेडून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरविले. साधारणपणे एक हजार ७५ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. नवीन कर्ज घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत २४५ कोटीपर्यंत कर्जवाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. 

कर्जमुक्तीतून जिल्हा बँकेला ९१५ कोटी रुपये मिळाले. गेल्या आठवड्यापर्यंत ८८ कोटी रुपये, तर आतापर्यंत १३५ कोटी कर्ज वाटले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वाधिक ९१५ कोटीं कर्जवाटपाचे उद्दिष्टे असल्याने त्यांनी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक) 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com