Coronaupdate : जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ५१३ बळी; दिवसभरात ७१२ बाधित

अरुण मलाणी
Sunday, 11 October 2020

दिवसभरात जिल्ह्यात ७१२ नवीन बाधित आढळले. एक हजार ६१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, पंधरा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील ८०८ रुग्‍ण, नाशिक ग्रामीणचे ५१०, मालेगाव महापालिका हद्दीतील १६०, तर जिल्‍हाबाह्य पंधरा रुग्ण आहेत.

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्‍त होणाऱ्यांपेक्षा कमी असल्‍याने ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट होत आहे. ही दिलासादायक बाब असली, तरी आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने शनिवारी (ता. १०) पंधराशेचा टप्पा ओलांडला असून, कोरोनाबळींची संख्या एक हजार ५१३ वर पोचली आहे. 

दिवसभरात बरे झाले एक हजार ६१ रुग्‍ण

एक हजार ५१३ कोरोनाबळींपैकी ८०८ मृत्यू नाशिक शहरातील आहेत. दरम्‍यान, दिवसभरात जिल्ह्यात ७१२ नवीन बाधित आढळले. एक हजार ६१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, पंधरा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील ८०८ रुग्‍ण, नाशिक ग्रामीणचे ५१०, मालेगाव महापालिका हद्दीतील १६०, तर जिल्‍हाबाह्य पंधरा रुग्ण आहेत. शनिवारी नाशिक शहरातील तेरा व ग्रामीण भागातील दोन रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५३०, नाशिक ग्रामीणचे १५५, मालेगावचे १६, तर जिल्‍हाबाह्य अकरा रुग्ण आहेत. 

सद्यःस्‍थितीत आठ हजार ३९६ बाधितांवर उपचार

कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५२५, नाशिक ग्रामीणचे ४६१, मालेगाव महापालिका रुग्‍णालये ५७, जिल्‍हाबाह्य १८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८५ हजार ८२ वर पोचली असून, यापैकी ७५ हजार १७३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. सद्यःस्‍थितीत आठ हजार ३९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७५, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

मालेगावमध्ये ३३ पॉझिटिव्ह 

मालेगाव : शहर व तालुक्यात शनिवारी नव्याने ३३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १६, तर ग्रामीण भागातील १७ जणांचा समावेश आहे. शहरातील कुसुंबा रोड भागातील ६५ वर्षीय संशयित महिलेचा महापालिकेच्या सहारा काेविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मनपा रुग्णालयात नव्याने १२ रुग्ण दाखल झाले. १४५ अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील गृहविलगीकरणासह ३७२, तर तालुक्यातील २६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the district One thousand 513 corona victims nashik marathi news