esakal | थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

driver got stuck in the burning vehicle due to seatbelt

गाडी चालवताना सिटबेल्ट हा चालकाच्या सुरक्षेसाठी सिटबेल्ट चावण्याच्या सुचना दिल्या जातात.त्यामुळे अपघातप्रसंगी चालकाचा जीव देखील वाचतो. मात्र याउलट सिटबेल्टमुळेच चालकाचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) :  गाडी चालवताना सिटबेल्ट हा चालकाच्या सुरक्षेसाठी सिटबेल्ट चावण्याच्या सुचना दिल्या जातात.त्यामुळे अपघातप्रसंगी चालकाचा जीव देखील वाचतो. मात्र याउलट सिटबेल्टमुळेच चालकाचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

कैलास निवृत्ती शिंदे (३९, रा. वरचे चूचाळे, पाणीची टाकीजवळ, नाशिक) हे मुंबईवरून मालवाहतूक चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडीतून (एमएच-१५- एफव्ही-७९३५) गंगापूर - महिरवणी रोडवरून शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आपल्या मावस भावाला भेटायला जात होते. वासळी व पिंपळगाव शिवाजवळ गाडीला अचानक भीषण आग लागली. यामध्ये शिंदे १०० टक्के भाजले आहेत. त्यांचे वाहनदेखील जळून खाक झाले आहे.घटनेबद्दल नातेवाईक घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. 

अखेर झाली सुटका..

शिंदे यांनी आग लागलेल्या गाडीतून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु, सीटबेल्टमुळे सुटका होत नव्हती. यामध्ये ते १०० टक्के भाजले गेले. तरी देखील आगीमध्ये सीटबेल्ट तुटल्यानंतर त्यांनी सुटका करून घेतली. रस्त्यावर लोळून त्यांनी अंगाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांना रात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

अग्निशमन दलाने विझवली आग 

गाडीला लागलेल्या आगीची झळ दुसऱ्या वाहनांना लागू नये म्हणून त्यांनी आपली गाडी आतमधील रोडवर उभी केली असल्याचे दिसून आले आहे.  सदर घटनेची महिती सर्वात प्रथम वासळीतील शिवसेनेचे पदाधिकारी शांताराम चव्हाण यांना समजली. चव्हाण यांनी सातपूर पोलिस स्टेशन व अग्निशमन दलास माहिती कळवली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचवून आग विझवली.

घटनेची पुनावर्ती 

याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी डीसूजा नावाचे उद्योगपतीला गाडीतच जाळून मारण्याचे प्रकार घडला आहे. आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार