सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालय समोरून अपहरणकर्त्यास ताब्यात घेत बालिकेची सुटका केली आहे. यावेळी पोलीसांच्या चौकशीत तसेच या अपहरणामागे  सत्य समोर आले असून तसा खुलासा अपहरणकर्त्याने पोलीसांकडे केला आहे.

नाशिक : सिव्हील हॉस्पीटलमधून अपहरण झालेली दीड वर्षीय चिमुरडी अखेर सापडली आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळच्या सुमाराला गुन्हे शाखेच्या पथकाने सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालय समोरून अपहरणकर्त्यास ताब्यात घेत बालिकेची सुटका केली आहे. यावेळी पोलीसांच्या चौकशीत तसेच या अपहरणामागे सत्य समोर आले असून तसा खुलासा अपहरणकर्त्याने पोलीसांकडे केला आहे.

...म्हणून केले चिमुरडीचे अपहरण
माणिक सुरेश काळे असं या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा फुलेनगर शनी मंदिर येथे राहणारा असून त्याने दोन दिवसांपूर्वी एका बलिकेचे अपहरण केले होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी माणिक काळेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे माणिक काळेवर दुखाचा डोंगर कोसळला होता. नैराश्याने घेरलेल्या माणिकला आपल्याला आता आधार कुणीच नाही, अशी भावना निर्माण झाली होती. आपल्याला कुणी तरी आधार मिळावे  म्हणून माणिकने बालिकेला उचलून नेल्याचे सांगितले.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

अखेर प्रकरणाचा खुलासा
बाळाचे अपहरण केल्यानंतर त्याने बाळाला फुलेनगर येथील घरी देखील 2 दिवस ठेवले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून त्या चिमुरडीला खोकला येत असल्याने मंगळवारी सकाळी संशयित माणिक काळे हा तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पायी चालत घेऊन जात होता. त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने सुरेश काळेला सीबीएसजवळ ताब्यात घेतली. त्याची अधिक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidnapper arrested for abducted girl nashik marathi news