गव्हाच्या 'सोंगणी'साठी मिळेना मजूर...शेतकऱ्यांचे होताय हाल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

(सोयगाव) "लॉकडाउन' व सुरू असलेली संचारबंदी, तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संचारबंदीमुळे सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडून आहे. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. 

नाशिक : (सोयगाव) "लॉकडाउन' व सुरू असलेली संचारबंदी, तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संचारबंदीमुळे सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडून आहे. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. 

हार्वेस्टर मशिनमागे शेतकऱ्यांना दिवस- रात्र धावपळ

शहरासह तालुक्‍यात गेल्या आठवड्यात काही भागांत वादळासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी थंडीनेही कहर केला होता. त्यामुळे गव्हाचे पीक जोमात आले होते. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, "लॉकडाउन' व संचारबंदीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह सोंगणीसाठी कसरत करत आहेत. परराज्यातून येणाऱ्या सोंगणीच्या हार्वेस्टर मशिनमागे शेतकऱ्यांना दिवस- रात्र धावपळ करावी लागत आहे. रात्री- अपरात्री केव्हाही हे मशिन गहू काढण्यासाठी येते. मात्र, गहू काढणीसाठी भावापेक्षा अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

सध्या "लॉकडाउन'मुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदा अतिरिक्त पैसे देऊन हार्वेस्टर मशिनने गहू काढला. - गणेश शेवाळे, शेतकरी, टेहेरे

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to communication restrictions Labor not available For wheat harvest nashik marathi news