नव्या बांधकाम नियमावलीमुळे बांधकाम उद्योगाला चालना - राधाकृष्ण गमे

credai function.jpg
credai function.jpg

नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लँडस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. 

नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले

महाकवी कालिदास कलामंदिरात ‘क्रेडाई मेट्रो’तर्फे झालेल्या एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की नाशिक शहर सर्वार्थाने सुंदर असून, एकात्मिक नियमावलीमुळे शहर आणखी सुंदर करण्याची बांधकाम व्यावसायिक व वास्तू विशारदांची जबाबदारी वाढली आहे. एकात्मिक नियमावलीमुळे शहरीकरण वेगाने वाढेल. शहर वाढत असताना नाशिक परिसरातील निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. स्वच्छतेमध्ये देशात ११ वे स्थान पटकावलेल्या नाशिकमध्ये पुढील किमान ४० वर्षे पाण्याची अडचण नसून, घनकचरा व्यवस्थापनातही नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले आहे. 

तर अर्थचक्र फिरण्यासाठी मदत होईल

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, की नवीन बांधकाम नियमावली तयार करताना सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले, की गेल्या काही वर्षांतील बांधकाम व्यवसायातील मंदी, अनैसर्गिकरीत्या वाढलेले जमिनीचे भाव व कोविडमुळे अडचणीत सापडलेल्या स्थितीत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. स्टॅम्प ड्यूटीवरील सवलत व ही एकीकृत बांधकाम नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्र तसेच यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आधारित उद्योगांना चालना मिळून अर्थचक्र फिरण्यासाठी मदत होईल. 

घरांच्या किमती कमी होण्यास मदत

क्रेडाईचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष अनंत राजेगावकर म्हणाले, की एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरांचा समतोल विकास होण्यास मदत होईल. क्रेडाईचे राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर म्हणाले, का बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांचे काम सृजनशील निर्मितीचे आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले, की एकीकृत नियमावलीमुळे परवडणाऱ्या घरांची संख्या वाढण्याबरोबरच घरांच्या किमती कमी होण्यास मदत होईल. नगरविकास विभागाचे माजीसह संचालक प्रकाश भुक्ते, नगरविकास विभाग नाशिकच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल आदींनी मार्गदर्शन केले. आर्किटेक्ट अर्चना पेखळे व योगेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सचिव गौरव ठक्कर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com