
नाशिक : आतापर्यंत ज्याच्या हातून आपण रोजच्या आहारातील दुध विकतं घेत होतो त्याला व त्याच्या कुटूंबाला कोरोना झाल्यानंतर व तो आजार बरा होऊन महिना उलटल्यानंतरही त्याच्याकडून आता दुध घेणे नकोचं समाजाच्या या नकारात्मक मानसिकतेमुळे एका दुग्ध व्यावसायिकाला आर्थिक तंगीमुळे उदरनिर्वाहासाठी 50 म्हैस मिळेल त्या किमतीला विकाव्या लागल्याची घटना समोर आली आहे.
दुग्ध व्यवसायाला उतरती कळा
गेल्या 30 वर्षांपासून पेठरोड व पंचवटी परिसरात एका व्यक्तीचा दुग्ध व्यवसाय सुरु होता. संबंधित व्यावसायिकाने सुरुवातीला एक म्हैस विकतं घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. मार्च अखेरपर्यंत 90 म्हशींचा गोठा तयार होऊन दररोज 500 लिटर दुध संकलित होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण झाली. 90 म्हशींचा पसारा आवरण्यासाठी हाताखाली बिहारमधील 20 मजुर रोजंदारीवर कामाला घेतले. दुधाचा समावेश अत्यावशक्य वस्तुंमध्ये असला तरी भीतीमुळे ग्राहकांनी पिशवीतील दुध खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याने सुट्ट्या दुध विक्रीत घट झाली. कोरोनाने व्यवसायावर गंडांतर आल्यानंतर त्यातून सावरतं नाही तोचं त्याचं दुग्ध व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली.
त्याच्याकडून दुध नको रे बाबा
पाठोपाठ कुटूंबातील अन्य चार असे एकुण पाच जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने मजुरांनी गाशा गुंडाळून गोठा सोडला. त्यामुळे एकीकडे आजार व दुसरीकडे म्हशींचा पसारा कोण आवरणार असा प्रश्न निर्माण झाला. चौदा दिवस उपचार घेऊन दुग्ध व्यावसायिक व कुटूंब कोरोनामुक्त झाल्याने आता नव्याने व्यवसायाचा श्री गणेशा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दुध उत्पादन सुरु देखील झाले मात्र संबंधित व्यक्तीला कोरोना झाला असल्याने त्याच्याकडून दुध नको रे बाबा असे म्हणतं अनेकांनी दुध टाकण्यास नकार दिला.
जनजागृतीची गरज
एकापाठोपाठ एक करतं सर्वचं ग्राहक तुटल्याने आर्थिक मंदी आली. ग्राहकांना फोन करूनही आता नको नंतर बघू म्हणतं टाळले गेले. अगदी पंधरा, वीस वर्षांपासून ज्यांच्याकडे दुध टाकायचे त्यांनी देखील नकार दिला. त्यामुळे 90 म्हशींचा भार पेलता येणार नसल्याने अखेरीस मिळेल त्या किमतीला त्या म्हशी दुग्ध व्यावसायिकाला विकाव्या लागल्या असून उर्वरित 40 म्हशींना ग्राहक शोधण्यासाठी दुग्ध व्यावसायिकाची धडपड सुरु आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर योग्य उपचारातून संबंधित व्यक्ती बरे होते.
चौदा दिवसांपैकी कोरोना विषाणुचा प्रभाव सात दिवस राहतो. त्यामुळे एखाद्याला कोरोनाची लागण झाली म्हणजे कायमस्वरुपी संबंधित व्यक्ती कोरोना संसर्गित राहत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतू कोरोनाची भीती समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे की त्या व्यक्तीशी संपर्क नकोचं या नकारात्मक भुमिकेत लोक आले असून यातून कुटूंबे बरबाद होताना दिसतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.