येवल्यात अवकाळी पावसाचा कांद्यासह कपाशीला झटका; शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

सर्वाधिक नुकसान शेतातील लाल व रांगडा कांद्याचे होणार असून, अगोदरच रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाफ्यात रोपे कुजली असून, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे मावा व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भावही होणार आहे.

येवला (नाशिक) : गेले दोन दिवस दमट वातावरण असताना बुधवारी (ता. १८) दुपारपासून वाढलेल्या उष्णतेमुळे असह्य झाल्यानंतर शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी अवकाळी पावसने लागवड झालेला कांदा, कांदारोपे व काढून ठेवलेल्या मक्याला जोरदार झटका दिला.

शेतकऱ्यांची एकच धावपळ

शहर व परिसरात सायंकाळी पावणेसहापासून सव्वासहापर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच सावरगाव, सायगाव, नगरसूल, राजापूर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांनी मका बिट्या काढून पोळ घालून ठेवल्या असून, अचानक आलेल्या पावसामुळे काढलेला मका झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. सर्वाधिक नुकसान शेतातील लाल व रांगडा कांद्याचे होणार असून, अगोदरच रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाफ्यात रोपे कुजली असून, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे मावा व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भावही होणार आहे.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

डोंगळे खराब होण्याची शक्यता

बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेले डोंगळे खराब होण्याची शक्यता आहे. तसेच शेतशिवारातील वेचणीला आलेला कापूस भिजून खराब होणार आहे, द्राक्षबागांची फळकूज वाढण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी हादरले आहेत.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to unseasonal rains in Yeola Damage to cotton with onions nashik marathi news