COVID-19 : लॉक-डाऊनमुळे 'ई-कॉमर्स'तर्फे सेवा खंडित; केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची उपलब्धता

e-commerce3.jpg
e-commerce3.jpg

नाशिक : देशात लॉकडाऊन जाहीर केलेला असतांना विविध सेवा प्रभावित झालेल्या आहेत. एरवी घर बसल्या वस्तू उपलब्धतेसाठी नागरीकांकडून ई-कॉमर्सचा वापर केला जात असतांना, या काळात मात्र त्यापासूनही वंचित राहाण्याची वेळ आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची दखल घेत फ्लिपकार्ट, ऍमेझॉन सारख्या दिग्गजांसह अन्य ई-कॉमर्स कंपन्यांनी सेवा स्थगित केली आहे. 

सेवा लॉकडाऊनच्या काळापर्यंत खंडीत करण्याचा निर्णय

भारतीयांकडून ई-कॉमर्स खरेदीचे प्रमाण वाढत आहे. नाशिकसारख्या टीअर दोन शहरांतूनही या कंपन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतो. विशेषत: सेलच्या काळात भरघोस खरेदीचा आनंद ग्राहकांकडून लुटला जात असतो. परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अन्य विविध उद्योगांसह ई-कॉमर्स क्षेत्रालाही प्रभावित केले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरू असलेली ई-कॉमर्स कंपन्यांची सेवा सद्यस्थितीत खंडीत करण्यात आली आहे. यासंदर्भात फ्लिपकार्ट, ऍमेझॉन सारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या सेवा लॉकडाऊनच्या काळापर्यंत खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा संदेश या कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावरही जारी केलेला आहे. त्यामूळे लॉक-डाऊनमुळे आधीच घरी बसून असलेल्या नागरीकांना आपली ऑनलाईन वस्तू खरेदीची हौस पूर्ण करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. 

फूड डिलेव्हरी सेवाही खंडीत 

विविध कंपन्यांकडून घरपोहोच खाद्य पदार्थ पोहच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यास प्रतिसाद ही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र लॉक-डाऊनमुळे बहुतांश सर्वच हॉटेल्स बंद असल्याने तसेच रस्त्यावर नागरीकांना फिरण्यास मनाई असल्याने खाद्यपदार्थ उपलब्धता व पोहच करणाऱ्या मनुष्यबळाअभावी फूड डिलेव्हरी सेवाही खंडीत केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com