ह्रदयद्रावक! घराच्या ओढीने सुरू झालेला इवल्याश्या चिमुकलीचा प्रवास मृत्यूच्या थांब्यावर..

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 16 May 2020

कर्जत येथील परप्रांतीय मजूर इमामुद्दीन निजामुदिन खान हे पत्नी नुसरत खान व आठ महिन्याची आलिया हिला घेऊन उत्तरप्रदेशात निघाले होते. दरम्यान वडिलांनी ओढणीच्या मदतीने पोटाला लपटलेली आलिया कर्जत पासून चांदवड पर्यंतचा प्रवास आपल्या इवल्याश्या डोळ्यात कैद करत होती. प्रवासात दोन वेळा उन्हाच्या तडाख्यात बापाच्या कुशीत विसावली होती आलिया..पण पुढे..

नाशिक / गणुर : लॉकडाऊन नंतर घराच्या ओढीने उत्तरप्रदेश येथे मोटारसायकलवरून निघालेल्या दाम्पत्याचा अपघात होऊन अवघ्या आठ महिन्याच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. १६) रोजी चांदवड नजीक घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घराच्या ओढीने सुरू झालेला हा प्रवास मृत्यूच्या थांब्यावर जाऊन थांबला. 

घराची ओढ मृत्यूच्या दिशेने!

कर्जत येथील परप्रांतीय मजूर इमामुद्दीन निजामुदिन खान हे पत्नी नुसरत खान व आठ महिन्याची आलिया हिला घेऊन उत्तरप्रदेशात निघाले होते. मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड नजीक त्यांच्या एमएच ४६ बीडब्ल्यू २६५५ ह्या मोटारसायकलचा अज्ञात बस सोबत अपघात झाला. दरम्यान वडिलांनी ओढणीच्या मदतीने पोटाला लपटलेली आलिया कर्जत पासून चांदवड पर्यंतचा प्रवास आपल्या इवल्याश्या डोळ्यात कैद करत होती. प्रवासात दोन वेळा उन्हाच्या तडाख्यात बापाच्या कुशीत विसावलेली आलिया ह्या अपघातात जागीच मृत्यू पावली तर वडील गँभिर जखमी झाले. घटनास्थळी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने धाव घेत डॉ. सतिष गांगुर्डे व गणेश खालकर यांनी जखमी पतीला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत चांदवड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा

परप्रांतीय चिमुकलीचे चांदवडला अंत्यसंस्कार

आठ महिन्याच्या आलियाचे शव उत्तरप्रदेशात शेकडो किलोमीटर घेऊन जाणे सोयीचे नसल्याने नातेवाईकांच्या संमतीने आलिया चे अंत्यसंस्कार चांदवड येथील मुस्लिम बांधवांनी धार्मिक रितिरिवाजाप्रमाणे केले. यावेळी मौलाना मंजूर आलम, वाजीद घासी, आसिफ घासी, इम्रान खान, उबेद मिसगर, वसीम खान, इर्शान मणियार, रिजवान घासी, वाजीद घासी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight-month-old girl died in bike accident nashik marathi news