निफाड मतदारसंघात वाढले ४५ गावांचे आठ हजार मतदार 

votors.
votors.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला बुधवार (ता.२३)पासून सुरवात झाल्याने धुराळा उडाला आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्याने निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. मतदारांच्या संख्येवर संभाव्य उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा निफाड मतदारसंघातील ४५ गावांमध्ये आठ हजार मतदारांची वाढ झाली आहे. काठावरच्या व काट्याच्या लढतीत वाढीव मतदार निर्णायक ठरतील. त्यामुळे वाढलेल्या मतदारांचे दान कोणाच्या झोळीत पडणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, ही मते मिळवण्यासाठी गावागावांत रस्सीखेच बघायला मिळणार आहे. 

बारा गावांमध्ये प्रत्येक मतदारामागे टाइट फिल्डिंग

उमेदवारी अर्ज दाखल करून रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. राजकीय डावपेच व गणिते आखली जात आहेत. काही गावांमध्ये बिनविरोधची चर्चा सुरू आहे. दोन हजार मतदारांपेक्षा कमी संख्या असलेल्या बारा गावांमध्ये प्रत्येक मतदारामागे टाइट फिल्डिंग लावली जात आहे. मतदारसंख्या तेवढाच महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. गतवेळी २०१५ च्या निवडणुकीत ४५ गावांचा समावेश होता. त्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गतवेळी एक लाख २९ हजार १९ मतदारांची नोंदणी होती. या वेळी ही संख्या आठ हजार ८६ ने वाढून एक लाख ३८ हजार झाली आहे. गावच्या राजकारणात टोकाची इर्षा असते. त्यामुळे चुरशीने मतदानही घेतले जाते. वाढीव आठ हजारांहून अधिक मतदारांत ९० टक्क्यांहून अधिक तरुण मतदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. यामुळे या मतदानावर इच्छुकांचे डोळे राहणार आहेत. तसेच हे मतदान नजरेसमोर ठेवून उमेदवारी देतानाही तरुणांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. 

ओझरचे इच्छुक बुचकळ्यात 

निवडणुकीच्या तोंडावर ओझरला नगर परिषदेचा दर्जा देण्याचा अध्यादेश शासनाकडून आणून माजी आमदार अनिल कदम यांनी मास्टर स्ट्रोक मारला. पण निवडणूक आयोगाच्या ग्रामपंचायत निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेला न्यायालयाने हिरवा कंदील दिला. यामुळे ओझरची ग्रामपंचायत निवडणुक सुरू असताना नगर परिषदेची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक झाली तरी कोणत्याही क्षणी नगर परिषदेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यामुळे निवडून आलो तरी हे पद औटघटकेचे ठरू शकते. त्यामुळे गुंतवणूक करूनही ती वाया जाण्याची शक्यता आहे. तर निवडणूक नाही लढलो, तर राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची भीती इच्छुकांना आहे. त्यामुळे ओझरचे इच्छुक सध्या बुचकळ्यात पडले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com