बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

प्रकाश बिरारी
Sunday, 29 November 2020

कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली होती. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी झोपेत असतांना घडले अघटित. ती गाढ झोपेत असतांनाच आला अनपेक्षित पाहुणा. पाहुणा कसला काळच होता तो. अन् नंतर घडले असे...

कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली होती. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी झोपेत असतांना घडले अघटित. ती गाढ झोपेत असतांनाच आला अनपेक्षित पाहुणा. पाहुणा कसला काळच होता तो. अन् नंतर घडले असे...

बारा दिवस झुंजूनही सलोनीला मृत्यूने गाठले

सलोनी बिरारी ही बारावीत शिकणारी तरुणी दिवाळीनिमित्त निंबोळा (ता. बागलाण) येथे मामाच्या गावी गेली होती. तिला दिवाळी पाडव्याच्या दिवशी झोपेतच मण्यार या अतिविषारी सर्पाने दंश केला. तेव्हापासून तर आजपर्यंत तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली. स्वभावाने अतिशय मनमिळावू, शिक्षणात हुशार व कुटुंबातील एकुलत्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. अतिविषारी सर्पाच्या दंशामुळे सलोनीला उपचारासाठी तत्काळ दाभाडी व लगेच मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तब्बल बारा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

अखेर संपूर्ण शरीरातच विष भिनल्यामुळे शनिवारी (ता.२८) सकाळी तिची प्राणज्योत मालवली. सायंकाळी कंधाणे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ती विलास बिरारी यांची एकुलती मुलगी व ‘बॉश’ नाशिकचे कर्मचारी राजेंद्र बिरारी यांची पुतणी होती.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighteen years old girl dies of snake bite nashik marathi news