"तो अपंग आहे, त्याला घ्यायला जावे लागते" सोशल मीडियावर भावनिक साद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

मालेगावातील कोरोना रुग्णांची संख्या 325 च्या पार गेली आहे. तीन दिवसांपासून आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, कलेक्‍टरपट्टा, सटाणा नाका, हिंमतनगर आदी भागांतील नागरिकांचा काही प्रमाणात समावेश आहे. ग्रामीण भागातील पहिला रुग्ण दाभाडीत आढळला. त्यामुळे ग्रामीण भाग पुरता हादरला आहे.

नाशिक / मालेगाव : "तो अपंग आहे, त्याला घ्यायला जावे लागते. त्यामुळे तुम्ही बाहेर पडून अपंग असलेल्या कोरोनाला घरी आणू नका. घरातच थांबा. काही दिवस शेतीमाल व इतर वस्तू गावातच विका. मालेगावसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊ नका', अशी भावनिक साद घालणारी पोस्ट सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

भावनिक साद घालणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल 
मालेगावातील कोरोना रुग्णांची संख्या 325 च्या पार गेली आहे. तीन दिवसांपासून आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, कलेक्‍टरपट्टा, सटाणा नाका, हिंमतनगर आदी भागांतील नागरिकांचा काही प्रमाणात समावेश आहे. ग्रामीण भागातील पहिला रुग्ण दाभाडीत आढळला. त्यामुळे ग्रामीण भाग पुरता हादरला आहे. 

हेही वाचा > लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना

त्याला आपल्या घरी व गावात आणू नका,
मालेगावच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक व शेतकऱ्यांना आवाहन करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. यात पैसे कमविले जातील, पैशांच्या मागे धावण्याच्या नादात कोरोना घरात आणू नका. काही दिवस मोठ्या शहरांमध्ये माल विक्रीस जाऊ नका. शेतकरी, तरुण व नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोना अपंग आहे. त्याला आपल्या घरी व गावात आणू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: emotional post about corona going viral on social media nashik marathi news