लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मण इंगोले.jpg

अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अश्विन नगर येथे सायंकाळच्या वेळी हिंगोली येथील ८५ वर्षीय लक्ष्मण इंगोले हे वयोवृद्ध व्यक्ती हरवल्याची बाब येथील विशेष पोलिस अधिकारी म्हणून बंदोबस्ताला असलेले अमोल शेवाळे व प्रताप मगर यांच्या लक्षात आले.

लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना

नाशिक : (सिडको) काका तुम्ही कोणाला शोधताय का?..आस्थेने विचारल्यावर ते हरवले असल्याचे समजले...त्यांना तर पत्ता देखील माहीत नव्हता, चेहरा केविलाणा झाला अन् शेवटी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले अन् अवघ्या दोन तासातच त्या हरविलेल्या वयोवृध्द व्यक्तीच्या चेहरावर हसू आले...ही मन हेलावून टाकणारी घटना घडली अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अश्विन नगरमधील...  

असा आहे प्रकार

अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अश्विन नगर येथे सायंकाळच्या वेळी हिंगोली येथील ८५ वर्षीय लक्ष्मण इंगोले हे वयोवृद्ध व्यक्ती हरवल्याची बाब येथील विशेष पोलिस अधिकारी म्हणून बंदोबस्ताला असलेले अमोल शेवाळे व प्रताप मगर यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही उशीर न करता या वयोवृद्ध व्यक्तीची विचारपूस करून पोलीस ठाण्यात सुखरूप आणले. त्यांना चहा पाणी पाजले. त्याठिकाणी बसायला जागा दिली. आस्थेने विचारपूस केली. परंतु त्यांना पत्ता सांगता येत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलिसांची परवानगी घेत सोशल मीडियावर या बाबांची माहिती व्हायरल केली. त्यानंतर दोन तासाने गणेश चौकात राहणारे त्यांची जावई बबन सरकटे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. जावयाला पाहून सासऱ्यांना आनंद झाला आणि दोघांची गळाभेट झाली. मन हेलावून टाकणारा हा प्रसंग ठरला. याकामी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय शिंपी, देवेंद्र बर्डे प्रशांत नागरे, विशेष पोलीस अधिकारी अमोल शेळके, प्रताप मगर यांची महत्त्वाची भूमिका ठरली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! कुणीतरी वाचवा हो, माझ्या बाळाला!...काळजाच्या तुकड्याला रक्ताच्या थारोळ्यात बघून मातेचा आक्रोश..

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी आमची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही आमची कामगिरी यशस्वी पार पाडल्याने आम्हाला वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळाली. याचे आम्हाला मनापासून समाधान आहे. असेच कार्य यापुढेही आम्ही सुरु ठेवू. - अमोल शेळके, विशेष पोलीस अधिकारी

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

loading image
go to top