एका कॉलवर "इथे" मिळतेय अप्रत्यक्षारित्या दुर्घटनांना आमंत्रण!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

नायलॉन मांजा मनुष्यासह पक्षी, प्राण्याना अतिशय धोकादायक आहे. अनेकाना त्याचा फास लागून प्राण गमवावे लागले आहे. पोलिसाना दुकानांमध्ये नायलॉन मांजाची विक्री होताना आढळून येत नाही. तर मग मांजा येतो कुठून?

नाशिक : पोलिस कारवाईच्या भितीने नायलॉन मांजाचे सोशल मिडीया आणि ऑन कॉल माध्यमातून विक्रीचे प्रमाण वाढले आहे. सोशल मिडीया माध्यमातून मांजा पसंती तर ऑन कॉल माध्यमातून मांजा खरेदी विक्रीचे ठिकाण निश्‍चित केले जाते. पोलिस आणि वन विभागाचे कर्मचारी केवळ दुकानांवरील विक्रीवर लक्ष देवून आहे. 

अप्रत्यक्षारित्या दुर्घटनाना निमंत्रण

नायलॉन मांजा मनुष्यासह पक्षी, प्राण्याना अतिशय धोकादायक आहे. अनेकाना त्याचा फास लागून प्राण गमवावे लागले आहे. पोलिसाना दुकानांमध्ये नायलॉन मांजाची विक्री होताना आढळून येत नाही. तर मग मांजा येतो कुठून तो येतो, " सोशल मिडीया आणि ऑन कॉल ' माध्यमातून. याठिकाणी सर्रास मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. 

कारवाईच्या सुचनांकडे कानाडोळा

जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाकडून नायलॉन मांजा बंदीचे पत्रक काढून संबंधीत विभागास कारवाईच्या सुचना केल्या आहे. त्यानुसार पोलिसानी काही दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली. संपूर्ण शहरात 5 ते 6 कारवाई सोडल्यास पोलिसांच्या हाती काही लागले नाही. मांजाचा वापर मात्र सर्रास होताना दिसत आहे. तरीही पोलिसाना खबर लागत नाही. विक्रेता आणि ग्राहक दोघांचा हेतू मात्र साद्य होवून जातो. अप्रत्यक्षारित्या दुर्घटनाना निमंत्रणही मिळून जाते. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यानी दुकानासह सोशल मिडीया आणि ऑन कॉल प्रणालीवर लक्ष देणे आवश्‍यक आहे. तरच खऱ्या अर्थाने नायलॉन मांजा विक्रीस आळा घालणे शक्‍य होईल. अशी प्रतिक्रीया नागरीकांकडून दिल्या जात आहे. 
 
हेही वाचा >
 स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!

नायलॉन मांजा ऑन कॉल 
आधुनिकतेची कास धरलेल्या समाजात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक वस्तू खरेदी विक्री केल्या जातात. अनेक जण सोशल मिडीया ( व्हॉटस्‌ ऍप) चा वापर करुनही मांजा विक्री करत आहे. तर काही ऑन कॉल माध्यमातून दुकानदार ग्राहक एकमेकांच्या संर्पकात राहत असतात. नायलॉन मांजाची आवश्‍यकता भासल्यास ग्राहक दुकानदारास फोन करुन जागा निश्‍चित करतो. त्याठिकाणी दुकानदार मांजा विक्रीस जातो. अरुंद गल्लीबोल आणि अंधाराच्या ठिकाणी असे प्रकार घडत आहे. 

हेही वाचा > शेजारचाच आवडत होता तिला...शेवटी पतीने..

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on selling on-line, on-call nylon kite rope nashik marathi news