kalavant.jpg
kalavant.jpg

कोरोनोनंतरही कलावंतांची परवड कायम; अनेक स्पर्धांना वर्षभरापासून ब्रेक

नाशिक : नाशिक शहरात अनेक नवोदित कलावंत आहेत. कोरोनानंतरच्या काळातही संधी मिळत नसल्याने नियमित सराव करताना व्यावसायिकांसह हौशी कलाकार/कलावंतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोनानंतरच्या काळातही कलाकार/कलावंतांना व्यासपीठ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. 

व्यासपीठ नसल्याने उत्साहावर विरजण 

नाशिकमध्ये अनेक स्पर्धांना वर्षभरापासून ब्रेक लागला आहे. या स्पर्धांच्या निमित्ताने कलाकारांना व्यासपीठ मिळण्याबरोबर नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यसंगीत आदी पडद्यामागील महत्त्वाच्या बाबी त्यातील बारकावे शिकण्यास मदत होत असते. गेल्या वर्षात सगळ्याच क्षेत्रात मोठे नुकसान झाले. चांगल्या कलावंतांना व्यासपीठ मिळत नसल्याने कलाकारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. कोरोना काळानंतरही सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे जे कलाकार, कलावंतांचे संसार या सर्व गोष्टीवर चालतात, त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातील अनेक कलाकार कर्जबारी झाले आहेत. त्यांना उपजीविकेसाठी दुसरे साधन शोधण्याची वेळ आली आहे. पडद्यामागील कलाकारांनीही दुसरा पर्याय निवडला असून, सर्व सुरळीत केव्हा होते याची वाट कलाकार/कलावंत बघत आहे. व्यावसायिक नाटक नवीन वर्षात सुरू जरी झाले असले तरी त्यांची संख्या पाहता सर्वकाही सुरळीत होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. 

व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी प्रकार असले तरी वर्षभरात हौशी नाटकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. व्यावसायिक नाटकांतील पडद्यामागील कलाकारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनामुळे नाटकांचे प्रयोग थांबले आहेत. ती खंत आहे. कोरोनाबरोबर हौशी कलाकारांना जागेची उपलब्धता होत नसल्याने प्रयोगांची संख्या कमी झाली आहे. नाटकांचा महोत्सव न झाल्याने सगळ्यांनाच पोकळी जाणवत आहे. - धनजंय वाभळे, नाशिक 

कलावंतांचे कुटुंब या सर्वांवर अवलंबून आहे. त्यांना या सगळ्यांचा फटका बसला आहे. सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन गरजू कलाकार, कलावंतांना मदतीसाठी पुढे यायला हवे, प्रयोग होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. नाटकांच्या प्रयोगाला परवानगी मिळाली तरी प्रेक्षक मिळतील का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. - अहमद शेख, नाशिक 

कलाकारांची प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे, यासाठी धडपड असते. कमी भांडवलात हौशी कलाकारांना कोरोनाचे नियम पाळत प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कलाकरांना जागा उपलब्ध होत नसल्याने सराव करता येत नाही. - नीता कोठेकर, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com