esakal | "वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची मुदत वाढवा"...रिक्षा-टॅक्‍सी संघटनेचा आग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

rickshaw taxi.jpg

लॉकडाउनच्या काळात वाहतूक सेवा बंद असल्याने आर्थिक संकटामुळे मुदत संपलेल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात रिक्षा-टॅक्‍सीचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने नूतनीकरणाची मुदत वाढविण्यासाठी संघटनेकडून आग्रह करण्यात येत आहे.

"वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची मुदत वाढवा"...रिक्षा-टॅक्‍सी संघटनेचा आग्रह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळालीगाव : लॉकडाउनच्या काळात वाहतूक सेवा बंद असल्याने आर्थिक संकटामुळे मुदत संपलेल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात रिक्षा-टॅक्‍सीचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने नूतनीकरणाची मुदत वाढविण्यासाठी संघटनेकडून आग्रह करण्यात येत आहे.

रिक्षा-टॅक्‍सी संघटनेचा आग्रह 
 राज्य शासनाने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात सोमवार (ता. 8)पासून "मिशन बिगेन अगेन' मोहिमेद्वारे रिक्षा-टॅक्‍सीचालकांना दोनच प्रवासी वाहून नेण्याची परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वेसेवा व बससेवा बंद असल्याने प्रवाशांअभावी रेल्वेस्थानक व बसस्थानक ओस पडली आहेत, अशा परिस्थितीत दोनच प्रवाशांवर व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, बॅंकेचे कर्ज-हप्ते, दवाखाना-आरोग्य, घरभाडे, वीजबिल, पाणीबिल, मुलांचे शिक्षण आदींसह रिक्षा-टॅक्‍सीच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अशा आणीबाणीच्या कालावधीत अतिशय अवघड व आर्थिक अडचणीचे बनले आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत वाहनांच्या प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 30 सप्टेंबरऐवजी 31 डिसेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्‍सीचालकांनी केली आहे.

 हेही वाचा > PHOTOS : दुर्दैवी घटना! पोलीस अधिकारीच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा..सुट्टीनिमित्त घरी जातानाच काळाचा घाला..पाहा

प्रत्येकी दहा हजारांची मदत
लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या रिक्षा-टॅक्‍सीचालकांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकटामुळे उपासमारीची वेळ आली. वाहनांच्या कागदपत्रांची मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत वाढवावी. महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर रिक्षा-टॅक्‍सीचालकांना प्रत्येकी दहा हजारांची मदत करावी. - हैदरभाई सय्यद (अध्यक्ष, भद्रकाली ऑटोरिक्षा-टॅक्‍सी युनियन नाशिक) 

 हेही वाचा > धक्कादायक! ३५ वर्षांचा घरोबा..सख्खे शेजारी..कुटुंबासाठी धावणाऱ्यांचाच विश्वासघात