esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

chadegaon.jpeg

मध्यरात्रीच्या वेळी एका कठडे नसलेल्या धोकादायक विहिरीत तीन वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना कोसळला...सकाळी समजला प्रकार...बघ्यांची भरली जणू जत्राच अन् मग नंतर झाले असे...

VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

sakal_logo
By
अंबादास शिंदे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) मध्यरात्रीच्या वेळी एका कठडे नसलेल्या धोकादायक विहिरीत तीन वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना कोसळला...सकाळी समजला प्रकार...बघ्यांची भरली जणू जत्राच अन् मग नंतर झाले असे...

असा आहे प्रकार

चाडेगाव-चेहेडी शिव रस्तावरील नारायण अरिंगळे यांच्या शेतात काम करणारे मजूर शेताच्या बाजूला राहतात. शुक्रवारी (ता. 24) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान महिला विहीरजवळ असलेल्या टाकीवर हात धुण्यासाठी गेली असता तिला बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्या महिलेने विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या विहिरीत पडला दिसला. त्यांनी शेतमालक अरिंगळे यांना सदर माहिती कळविली. वनविभागाच्या रेस्क्यू पथकांचे नवक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल भालेराव मधुकर गोसावी, वनरक्षक उत्तम पाटील, गोविंद पांढरे, राजेंद्र ठाकरे, मोबाईल दक्षता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबटया बघण्यासाठी नागरिकांनी मोठी जणू जत्राच भरली होती. या गर्दीमुळे वनविभागाला बिबट्याला विहिरतून बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत होता. बघ्यांचा आवाज अन् गोंगाटाने बिबट्या वारंवार बिथरत विहिरीत सैरावैरा पळत होता. सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेले 'मिशन रेस्क्यू' दहा वाजता यशस्वीपणे पुर्ण झाले.

हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...

पंधरा दिवसात तीन बिबटे जेरबंद

दोन तीन महिन्यापासून नाशिक रोड पुर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ कायम आहे. त्यासाठी वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहे. सोमवारी (ता. 21) रोजी पळसे गावात लावलेला पिंजऱ्यात बिबट्य़ाची एक लहान मादी जेरबंदी झाली होती. या मादीची रवानगी बोरिवलीतल्या संजय गांधी उद्यानात करण्यात आली. मागील पंधरा दिवसात तीन बिबटे या उद्यानात पाठविण्य़ात आले. तीन दिवसाचा कालावधी जात नाहीत तोच पुन्हा चाडेगाव शिवरात आरिंगळे मळात विहीरीत बिबटया पडल्याचे आढळून आले. 

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

(संपादन - किशोरी वाघ)

go to top