esakal | नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

family crime.jpg

कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील आईसह बहीण व भावाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : ​कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील आईसह बहीण व भावाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

पोलिस ठाण्यात नोंद

कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील आईसह बहीण व भावाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी सातला उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉलजवळ घडली. घटनेत आईचा मृत्यू झाला असून, बहीण व भावावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न 
सोनल सुहास शहा (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे. तनुष सुहास शहा (१७) आणि रिया सुहास शहा (१२) असे उपचार घेणाऱ्या बहीण व भावांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून शहा कुटुंबातील सोनल शहा, तनुष आणि रिया यांनी विषप्राशन केले. ही बाब सुहास प्रमोदकुमार शहा यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ उपचारार्थ तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

आईचा मृत्यू; बहीण-भावावर उपचार सुरू 

वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी तपासणी करत सोनल शहा यांना मृत घोषित केले. तनुष आणि रियाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र बैसाणे तपास करत आहेत.  

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड