esakal | धक्कादायक! ''हे' रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांसाठीच'...म्हणून रुग्णाला पाठविले माघारी...अन् अखेर
sakal

बोलून बातमी शोधा

snake bite.jpg

शेतात काम करत असतांना विषारी सापाने केला त्यांच्या दंडाला दंश... पळतच ते घरी आले. तात्काळ दवाखान्यातही नेले...मात्र हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी असून इतर वैद्यकीय सेवा बंद असल्याने तुम्ही यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जा असं सांगण्यात आलं...अन् या धावपळीत अखेर त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक! ''हे' रुग्णालय फक्त कोरोना रुग्णांसाठीच'...म्हणून रुग्णाला पाठविले माघारी...अन् अखेर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (डांगसौंदाणे) शेतात काम करत असतांना विषारी सापाने केला त्यांच्या दंडाला दंश...पळतच ते घरी आले. तात्काळ दवाखान्यातही नेले...मात्र हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी असून इतर वैद्यकीय सेवा बंद असल्याने तुम्ही यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जा असं सांगण्यात आलं...अन् या धावपळीत अखेर त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

अशी आहे घटना

शेतकरी मधुकर विठल खैरनार (वय 59) रविवारी (ता.24) दुपारी आपल्या कांदा चाळीत बसलेले असतांना अत्यंत विषारी सापाने त्यांच्या दंडाला दंश केले. खैरनार यांच्या तात्काळ लक्ष्यात आल्याने त्यांनी घरच्यांना सांगत तात्काळ डांगसौदाणे ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने कोव्हिड सेंटर म्हणून ताब्यात घेतल्याने येथील इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. खैरनार यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचे सांगण्यात आले. 20 किलोमीटरवरील कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचाराला वेळ झाल्याने त्यांची प्राणजोत मालवली. या घटनेमुळे डांगसौंदाणे परिसरातील असंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला असून रुग्णालय असून नसल्यासारखे झाल्यामुळे शेतकरी मधुकर खैरनार यांचा मृत्यु झाला. 

हेही वाचा > "मी कोरोनामुक्त झालो असलो.. तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण..."

शासनाला यापूर्वीच या भागात अन्य दवाखाने नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली, तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी खैरनार यांना मृत्युला सामोरे जावे लागले. अजुन किती जण उपचार न मिळणाऱ्या आरोग्यसेवेचे बळी ठरणार असा प्रश्न विचारला जात आहे.  

हेही वाचा > विमानसेवा सुरु तर होतेय....पण 'या' सेवेबाबत अस्पष्टताच!