शेतकरी सासऱ्याचे जावयाला अधिक मासचे "स्पेशल गिफ्ट"! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

खंडू मोरे
Monday, 5 October 2020

सध्या अधिकमास सुरू असल्याने व अधिकमासात (धोंडा) मुली व जावयाला वाण लावण्याची पद्धत आहे. यातच सध्या अधिकमासाचा महिना सुरू आहे. यात जावयाला घरी बोलावून वाण देण्याची पद्धत आहे. विशेषतः नवविवाहितांसाठी सासूरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू होते. यात सासरकडच्या मंडळींकडून जावयास आकर्षक भेटवस्तू दिली जाते. ज्याचा फोटो सर्वत्र व्हायरल होतोय तसेच याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

खामखेड (जि.नाशिक) : सध्या अधिकमास सुरू असल्याने व अधिकमासात (धोंडा) मुली व जावयाला वाण लावण्याची पद्धत आहे. यातच सध्या अधिकमासाचा महिना सुरू आहे. यात जावयाला घरी बोलावून वाण देण्याची पद्धत आहे. विशेषतः नवविवाहितांसाठी सासूरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू होते. यात सासरकडच्या मंडळींकडून जावयास आकर्षक भेटवस्तू दिली जाते. ज्याचा फोटो सर्वत्र व्हायरल होतोय तसेच याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

कळवणला मामाकडून जावयास अधिकमासचे स्पेशल गिफ्ट

कळवण तालुक्यातील भेंडी या गावात आगळावेगळा धोंडा बघायला मिळाला. शेतकरी रावण रौंदळ, दीपक रौंदळ, अशोक रौंदळ या मामांनी आगळावेगळा धोंडा करण्याचे ठरवित आपल्या विवाहित भाचा योगेश पाटील व अविवाहित भाचा अक्षय निकम यांना धोंडानिमित्ताने आग्रहाचे आमंत्रण दिले. भाचे जेवणास बसले असता या मामांनी जेवणाच्या ताटासमोर दोघेही भाच्यांना वाण म्हणून प्रत्येकी एक एक पायली कांदा बियाणे ठेवले. सध्या कांदा बियाण्यांचा दर मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे आणि यातच कांदा बी वाण मिळताच दोघेही भाचे आनंदित झाले. धोंडानिमित्ताने कांदा बी वाण लावल्याने हा विषय सध्या सोशल माध्यमांमध्ये कौतुकाचा ठरत आहे. 
हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच कांदा रोपाचेदेखील खूप नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर उड्या पडल्या आहेत. मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांकडून कांदा बी खरेदी करण्यात आली होती. नाशिकसह राज्यभरात कांदा बियाण्यांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. यातच लागवड केलेले कांदा रोपे खराब होत असल्याने रोपे जगविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

कसमा पट्ट्यात चर्चेचा विषय

यानिमित्ताने भेंडी (ता. कळवण) येथील एका शेतकरी कुटुंबाने भाचा व जावयास एक पायली कांदा बी देत अधिकमास साजरा केला. कांदा बी मिळाल्याने जावयासह भाचादेखील खूश झाले. मात्र, सासऱ्यांकडून मिळालेली ही अनोखी भेट संपूर्ण कसमा पट्ट्यात चर्चेचा विषय बनली आहे. भेटीप्रसंगी हा फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

संपादन- ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer Special Gift for adhik Mas nashik marathi news