निताणे गावात शेळी चोरांचा उच्छाद; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष  

दीपक खैरनार
Monday, 12 October 2020

शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी पशुपालन करीत आहेत. मात्र या पशूंवर चोरट्यांनी नजर टाकली असून अनेक शेळ्या व बोकड छोट्या वाहनातून चोरल्याचे पंचायत समिती सदस्य वसंत पवार यांनी सांगितले.

नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील निताणे गाव व परिसरात बोकड शेळी चोरांनी उच्छाद मांडला असून अनेक शेळ्या व बोकड अज्ञात चोरट्यांनी वाहनात डांबून चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गस्त घालावी व चोरट्यांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी पशुपालन करीत आहेत. मात्र या पशूंवर चोरट्यांनी नजर टाकली असून अनेक शेळ्या व बोकड छोट्या वाहनातून चोरल्याचे पंचायत समिती सदस्य वसंत पवार यांनी सांगितले. गावात व शेतात अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन केले आहे. रात्री व भरदिवसा छोट्या वाहनातून काही चोरटे फिरत आहेत. एकीकडे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने स्थानिक सातच्या आत घरात राहवे लागत आहे. पंचायत समिती सदस्य श्री. पवार यांच्याही मालकीच्या शेळ्यांवर चोरट्यांनी हात साफ केला असून बिबट्या आणि चोरट्यांनी या परिसरात उच्छाद मांडला आहे. पोलिसांनी गस्त घालून परिसरात होणा-या भुरट्या चो-यावंर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.   

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers cattle are being stolen in nitane village area nashik marathi news