शेतकऱ्यांकडून द्राक्षचोरांना दे दणादण! रंगेहाथ सापडली द्राक्ष चोरांंची टोळी

Farmers caught the gang stealing grapes and vegetables nashik marathi news.png
Farmers caught the gang stealing grapes and vegetables nashik marathi news.png

दिक्षी (जि.नाशिक) : दिक्षी, सुकेणा बाणगंगा काठ परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष भाजीपाला शेती केली जाते. कोरोना महामारी, अवकाळी पाऊस बदलत्या वातावरणाशी दोन हात करत रात्र दिवस काबाडकष्ट करत पिकवलेले थोड्या फार प्रमाणात काढणीस आलेले द्राक्षवर चोरटे डल्ला मारत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. 

कडाक्याच्या थंडीत शेत राखण्याची वेळ

बुधवारी सायंकाळी सुकेणे येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोतीराम जाधव यांच्या शेतात द्राक्ष चोरी करणारी एक टोळी शेतकऱ्यांना रंगेहात सापडली शेतकऱ्यांना त्या चोरांना चोप देत ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. द्राक्षांसह भाजीपाला, बागांवर पावडर फवारणीचे महागडे नोजल, टॅक्टर बॅटरी अशा विविध वस्तूच्या चोरीच्या बऱ्याच घटना दिक्षी थेरगाव सुकेणा परिसरात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतातील द्राक्ष रात्रीच्या अंधारात कुडकुडत राखण करण्याची वेळ येत आहे. शेतकऱ्यांना कधी व्यापारी गंडा घालतो. आता तर चक्क रात्रीचे चोरटे डल्ला मारत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.

बिबटयाचीही दहशत 

गेल्या आठ दिवसांपासून दिक्षी शिवारात बिबटयाने बऱ्याच कु>यांचा अक्षरशा फडशा पाडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे एकीकडे चोरटे तर राखण करतांना बिबटयाची भिती त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांपुढे इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार अनुभवास येत आहे

काबाडकष्ट करत पिकवलेल्या द्राक्षावर चोरटे डल्ला मारन्याच्या घटना प्रत्येक वर्षी घडतात सुकेना येथे द्राक्ष चोरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी 
-धनंजय भंडारे, उपसरपंच कसबे सुकेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com