esakal | एक स्त्रीलाच दुसरी स्त्री नकोशी!...अज्ञात निष्ठुर मातेने 'नकोशीला' झाडाच्या अडचणीत टाकून केले पलायन
sakal

बोलून बातमी शोधा

baby girl.jpg

(दिंडोरी) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नको असलेल्या चिमुकलीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली. या चिमुकलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.

एक स्त्रीलाच दुसरी स्त्री नकोशी!...अज्ञात निष्ठुर मातेने 'नकोशीला' झाडाच्या अडचणीत टाकून केले पलायन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दिंडोरी) जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नको असलेल्या चिमुकलीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली. या चिमुकलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.

अशी आहे घटना

तालुक्यातील अवनखेड शिवारात कादवा नदीलगत अज्ञात इसमाने स्त्री जातीचे एक दिवसाचे बालक झाडाच्या अडचणीत टाकून त्यावर कागद टाकून पलायन केले. शेजारी सागर जाधव यांची ऊसतोड चालू होती, येथील मजुरांनी बालकाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या बालकाला बाहेर आणून ऊस मालकाच्या स्वाधीन केले. ही घटना समजताच परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीसपाटील सतीश निकम व सरपंच नरेंद्र जाधव यांना दिली सरपंच जाधव यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आल्यानंतर त्या अर्भकाला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले, अर्भकाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजते. त्यानंतर दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला, पुढील तपास पोलिस हवालदार जाधव, भोये करत आहे. 

हेही वाचा > इलेक्‍ट्रॉनिक सायन्सची 'ती' विद्यार्थिनी अल्पवयात कीर्तनकार!...500 हून अधिक कीर्तन - प्रवचन

आज रविवार (ता. ८) रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला गेला. पंरतू, त्याच्या पूर्वसंध्येलाच एका नवजात चिमुरडीचा प्राण वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले़ या घटनेनंतर पंचक्रोशीत सदर नकोशीची चर्चा सुरू झाली आणि संबंधित मातेबद्दलही संतापाचा सूर उमटला़ चिमुरडीच्या रडण्याच्या आवाजामुळे शेतकऱ्यांना तिचा माग घेता आला. 

हेही वाचा > एकवीस वर्षांपासून 'ती'ने सायकलवर वृत्तपत्र विक्री करुन उभा केला संसार...!

go to top