जन्मदात्याचे चांगलेच फेडले पांग!...प्रॅापर्टीसाठी केला अमानुषपणाचा कहर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

आघार खुर्द (ता. मालेगाव) येथे शेतजमीन विक्रीच्या वादातून पिता-पुत्रांमध्ये जबर हाणामारीचा प्रकार घडला. शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीत पिता निवृत्ती मोरे जखमी झाले. पुत्रांनी जमीन खरेदीसाठी आलेल्या संशयितांना झाडाला बांधून दमबाजी केल्याचा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात जमीन खरेदीदार व मुलाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून हाणामारीचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक : आघार खुर्द (ता. मालेगाव) येथे शेतजमीन विक्रीच्या वादातून पिता-पुत्रांमध्ये जबर हाणामारीचा प्रकार घडला. शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीत पिता निवृत्ती मोरे जखमी झाले. पुत्रांनी जमीन खरेदीसाठी आलेल्या संशयितांना झाडाला बांधून दमबाजी केल्याचा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात जमीन खरेदीदार व मुलाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून हाणामारीचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

निवृत्ती मोरे यांनी त्यांच्या मालकीची जमीन विक्री करण्यासाठी शेख खालीद व शकील अहमद यांच्यासह सहकाऱ्यांना दाखविण्यासाठी आणले. वडील जमिन विक्री करीत असल्याने मुले योगेश, जयवंत, तसेच गोकुळ जगताप व शांताराम जगताप यांनी वडिलांसह चौघांना लाकडी काठीने जबर मारहाण केली. यात दोघे किरकोळ जखमी झाले. मुलांनी शकील अहमद याला झाडाला बांधून ठेवत दम दिला. वडिलांनाही, "तुम्ही जमीन कशी विक्री करतात', अशी दमबाजी केल्याची तक्रार खरेदीदार खालीद शेख समद (वय 34, रा. नूरनगर, मालेगाव) यांनी दिली आहे. याउलट योगेश मोरे याने वडील निवृत्ती मोरे यांच्यासह दहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा > हसत खेळत चिमुकली पाण्याच्या टबजवळ गेली...अन् थोड्या वेळातच भयाण शांतता!

वडिलांसोबत आलेल्यांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करून रस्त्यात दुचाकी अडवून आपणाला काठ्यांनी व दगडांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत मोबाईल गहाळ झाल्याचे त्याने नमूद केले आहे. योगेशच्या तक्रारीवरून पित्यासह दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > चार महिन्यांच्या गर्भवतीला सांगितले.."काहीही कर..पैसे आण"...ग्रामस्थांचा कॅंडलमार्च..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father hurt by farming dispute nashik marathi news