मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

सतीश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

हाय प्रोफाइल व अतिश्रीमंत कुटुंब म्हणून ओळख. अतिशय कष्टाने आपला व्यवसाय वाढविला. त्यांना एक मुलगा व दोन मुली, असा परिवार. मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलाचंही थाटामाटात लग्न केलं. नंतर उद्योजक हे स्वतः मुंबई येथील कॉर्पोरेट ऑफिस बघत असल्याने ते मुलाकडे नाशिकचा कारभार सोपवून मुंबईला राहायला गेले. पण महिन्यातून चार वेळा ते मुलाकडे येत-जात होते. मुलालाही एक सुंदर मुलगा झाल्याने आनंदाने घर भरलेलं असल्याने अतिशय खेळीमेळीच्या संसार सुरू होता. एके दिवशी...

नाशिक : अतिश्रीमंत कुटुंब... आलिशान राहणीमान... अचानक कुटुंबातील एकुलता एक मुलाचा मृत्यू... घरात संशयाने व्यापलेली जागा यामुळे सासू-सासरे व सून-नातू यांच्यात वाढलेला विसंवाद यामुळे सामाजिक जबाबदारी विसरत सासू-सासरे व सून यांनी एकमेकांविरोधात थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या दोघांच्या तक्रारीची नोंद सातपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

अशी आहे कहाणी....

सातपूर औद्योगिक वसाहतीत नामवंत उद्योगपतीची सातपूर नाईस भागात प्लॉट नंबर 21 वर स्वतःची कंपनी व परिसरातच आलिशान बंगला. मुंबई येथेही कॉर्पोरेट ऑफिससह देशातील विदेशात व्यवसायाचे जाळे. त्यामुळे समाजात हाय प्रोफाइल व अतिश्रीमंत कुटुंब म्हणून ओळख. अतिशय कष्टाने आपला व्यवसाय वाढविला. त्यांना एक मुलगा व दोन मुली, असा परिवार. मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलाचंही थाटामाटात लग्न केलं. नंतर उद्योजक हे स्वतः मुंबई येथील कॉर्पोरेट ऑफिस बघत असल्याने ते मुलाकडे नाशिकचा कारभार सोपवून मुंबईला राहायला गेले. पण महिन्यातून चार वेळा ते मुलाकडे येत-जात होते. मुलालाही एक सुंदर मुलगा झाल्याने आनंदाने घर भरलेलं असल्याने अतिशय खेळीमेळीच्या संसार सुरू होता. एके दिवशी अचानक मुलाचा अपघातात मृत्यू झाला. या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली. मुलाच्या अचानक जाण्याने हळूहळू परिस्थिती बदलत गेली.

हेही वाचा > मुलीचा विरह सहन होईना! व्याकूळ मातेचे अखेर टोकाचे पाऊल..

सासू-सासरे, सुनेची एकमेकांविरोधात तक्रार 

अतिश्रीमंती व घरातील विसंवादामुळे जावई व सुनेच्या आई-वडिलांचा घरात हस्तक्षेप वाढल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले अन्‌ ठिणगी पडली. यात सासू-सासरे यांना म्हातारपणी सून व नातूचा आधार व प्रेम, तर दुसरीकडे नातूला आजी-आजोबांकडून प्रेम कधी हिरावले गेले, हे दोघांनाही कळले नाही. परिणामी सासू-सासरे व सून हे थेट एकमेकांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत आपली सामाजिक बांधिलकीही विसरले. 

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father-in-law, mother-in-law and daughter-in-law complaining against each other for property Nashik Marathi News