Diwali Festival 2020 : ३५ मिनिटांत साकारली पंधरा फूट महालक्ष्मीची कलाकृती! नागरिकचे आकर्षण

प्रमोद दंडगव्हाळ
Saturday, 14 November 2020

लक्ष्मीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चित्रकाराने ३५ मिनिटांत पंधरा फुटांची महालक्ष्मीची कलाकृती साकारलेली कलाकृती सिडकोत नागरिकचे आकर्षण ठरली. 

सिडको (नाशिक) : लक्ष्मीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चित्रकाराने ३५ मिनिटांत पंधरा फुटांची महालक्ष्मीची कलाकृती साकारलेली कलाकृती सिडकोत नागरिकचे आकर्षण ठरली. 

सिडकोत पंधरा फूट महालक्ष्मीची कलाकृती 
दिवाळी महालक्ष्मी पूजनाच्या औचित्याने नाशिकमधील चित्रकार विनोद सोनवणे यांनी भव्य महालक्ष्मी कलाकृती अवघ्या ३५ मिनिटांत चित्रबद्ध केली. सिडको येथील रोड शोमध्ये हे चित्र साकारत उपस्थितांना सुखद धक्का दिला. चित्रकार विनोद सोनवणे यांनी अनेक चित्रांची मालिका साकारली असून, त्यात, नटसम्राट, लॉर्ड जीजस, वीर हनुमान आई दुर्गा अशा अनेक चित्रांचा समावेश आहे.  

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen feet art of Mahalakshmi idol drawing in 35 minutes cidco nashik marathi news