Breaking : मालेगावात निताज शोरूमला आग; अग्निशमन दलाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल

प्रमोद सावंत
Thursday, 15 October 2020

ज्वलनशिल वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीच्या ज्वाला दूर अंतरावरून दिसत होत्या.

नाशिक/ मालेगाव :  शहरातील साठ फुटी रस्त्यावरील निताज क्रिएशन्स या शोभेच्या वस्तू, फ्रेम, व डेकोरेटिव्ह दुर्मिळ वस्तू विक्रीच्या शोरूमला आग लागली. गुरूवारी (ता.15) रात्री ही आगीची घटना घडली. महापालिका अग्नीशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीचे निश्चित कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही. मात्र शोरूम मधील किंमती व मौल्यवान वस्तू पाहता नुकसान लाखोंचे असू शकते. ज्वलनशिल वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीच्या ज्वाला दूर अंतरावरून दिसत होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. अग्नीशामक व पोलिस दलाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. हे शोरूम निता मुंदडा यांच्या मालकीचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Nitaj showroom in Malegaon nashik marathi news