
गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रोत्सवाला कोरोनाची तीट लागली आहे. यंदा प्रथमच यात्रोत्सव होणार नसल्याने भाविकांना यात्रोत्सवात ऑनलाइन सहभागी व्हावे लागणार आहे.
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन प्रार्थना होणार आहे. केवळ ऑनलाइन प्रार्थनेच्या स्वरूपात यंदा यात्रोत्सव असणार आहे.
यंदा ऑनलाइन प्रार्थना
फेब्रुवारीत होणाऱ्या यात्रोत्सवाला दर वर्षी केरळ, तमिळनाडू, गोवा, गुजरात यासह देशातील आणि विदेशातील भाविक येतात. सव्वा ते दीड लाखाच्या आसपास भाविक येतात. याशिवाय रेल्वेतर्फे मुंबई ते नाशिकदरम्यान विशेष रेल्वेगाडी सोडली जाते. देशभरातील भाविक येतात. नेहरूनगर ते उपनगरपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा दुकाने थाटली जातात. महामार्गावरील वाहतूक वळविली जाते. गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रोत्सवाला कोरोनाची तीट लागली आहे. यंदा प्रथमच यात्रोत्सव होणार नसल्याने भाविकांना यात्रोत्सवात ऑनलाइन सहभागी व्हावे लागणार आहे.
हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल
पन्नास वर्षांचा इतिहास
झेकोस्लोव्हाकिया येथील बालकाच्या स्वरूपातील सुंदर मूर्ती असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव चर्च आहे. येथे सर्वप्रथम १९६९ मध्ये यात्रा भरली तेव्हापासून नित्यनेमाने दर वर्षी फेब्रुवारीत यात्रोत्सव भरतो. यंदाचे वर्ष मात्र याला अपवाद ठरणार आहे. ४ ते १२ फेब्रुवारीदरम्यान रोज सकाळी सातला इंग्रजीत प्रार्थना होईल. दुपारी बाराला मराठीत प्रार्थना होईल. यात्रोत्सवाची मुख्य प्रार्थना शनिवारी व रविवारी (ता. १४) या दोन दिवस सकाळी आठला इंग्रजी, नऊला मराठी, सकाळी दहाला कोकणी, तर सकाळी अकराला तमीळ भाषेत ऑनलाइन प्रार्थना होतील.
हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल