
साकुर फाटा व गाव अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चौदा दिवस पूर्णतः बंद करण्यात आले आहे. सोमवार (ता.२२) चाचणी करण्यात आली. त्यानंतर धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संजय शेगावकर व त्यांचे पथक बाधित रुग्णांच्या घरी दाखल झाले
नाशिक / अस्वली स्टेशन : इगतपुरीच्या पूर्व भागातील साकुर गावात एकाच कुटुंबातील पाच रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेले उर्वरीत क्वारंटाईन करण्यात आले आहेत. घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावर भाजीपाला विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जेष्ठ महिलेस प्रथमतः लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब बाधित झाले आहे. साकुर फाटा व गाव अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चौदा दिवस पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील कोरोना बाधित पाच रुग्ण सापडले
सोमवार (ता.२२) चाचणी करण्यात आली त्याचे रिपोर्ट आज दुपारी एक वाजता पॉझिटिव्ह आल्यानंतर धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संजय शेगावकर व त्यांचे पथक बाधित रुग्णांच्या घरी दाखल झाले असून पाचही बाधित रुग्णांना रुग्णवाहिकेतून नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता साकुर गाव पुढील चौदा दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. समस्त गावकऱ्यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन घरातच थांबावे कोणीही गावाबाहेर पडू नये अन्यथा बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी गावात प्रवेश नाही.ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गावचे सरपंच विनोद आवारी यांनी केले आहे.
हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग