कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कंटेन्मेंट अंमलबजावणीवर लक्ष...४५६ गावांत ग्रामसमित्या स्थापन 

village quarantine.jpg
village quarantine.jpg

नाशिक : आजारी पडल्यावर खासगी डॉक्टरांकडे इलाज घ्यायचे. रुग्ण बरा होत नाही म्हटल्यावर जिल्हा परिषदेच्या अथवा सरकारी रुग्णालयात पाठविले जायचे. त्या वेळी स्वॅब घेतल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह निघायचे. अनेकदा उपचाराला विलंब झाल्याने मृत्यूला कवटाळावे लागायचे. एवढेच नव्हे, तर कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव वाढायचा. हे ज्या वेळी ध्यानात आले, त्या वेळी खासगी आणि जिल्हा परिषद डॉक्टरांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात समन्वय वाढविण्यात आला. निफाड, दिंडोरी, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांत आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी कंटेन्मेंट झोन अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

४५६ गावांत ग्रामसमित्या स्थापन 
निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी आमदार निधीच्या जोडीला पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून कोरोना लढ्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये थर्मल मीटर, पल्स ऑक्सिमीटर, एक लाख मास्क, सॅनिटायझर, हायपोक्लोराइड आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, श्री. बनकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. निफाड तालुक्यातील ४४४ रुग्णांपैकी १२५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. २० मृत्यू झाले. पहिल्या ७५ रुग्णांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला होता. वयोवृद्ध, दुर्धर आजाराचे नागरिक मृत्यूला कवटाळतात हे ध्यानात आल्यावर तालुक्यातील अशा ४० हजार ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली. निफाडच्या पंचायत समिती सभापती अनुसया जगताप यांच्यासह उपसभापती, सदस्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे सरपंचांना सहकार्य मिळत आहे.

 निफाड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नरमधील स्थिती

कोरोनाग्रस्तांच्या भागातील उपाययोजनांसाठी २३ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मंडलाधिकारी, विस्ताराधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय विनामास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. निफाड तालुक्यातील ११९, दिंडोरीतील १२०, इगतपुरीमधील ९६, सिन्नरमधील ११४ अशा एकूण ४५६ गावांमध्ये ग्रामसमित्यांची स्थापना झाली आहे. या समित्या कार्यरत झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वावी (ता. सिन्नर) येथे कोरोना उपाययोजनांबद्दलचा आढावा घेतला. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणातून साखळी तोडण्याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. 

तालुकानिहाय लढ्याची स्थिती 

सिन्नर : 
* मुंबईहून आलेल्यांच्या माध्यमातून रुग्ण वाढल्याची स्थिती सुरवातीला होती. 
* आता इगतपुरीमधील कंपनीतील बाधित कामगार सिन्नर तालुक्यातील आहेत. 
* गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सभापती शोभा बरके यांच्यात समन्वय. 
* लोकप्रतिनिधींची रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यामध्ये मदत मिळते. 
* कोविड केअर सेंटरसाठी गावांनी केलीय मदत. 
* खासगी डॉक्टर संशयितांना आता तत्काळ सरकारी आरोग्य केंद्राकडे पाठवितात. 
* ४४२ कोरोनाबाधितांपैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून, ३१० जणांना घरी पाठवण्यात आले, तर आता १२१ रुग्ण. 

हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...
 
इगतपुरी : 

* एकाच कंपनीतील कोरोनाबाधित नाशिक शहरातील ११६, इगतपुरीमधील ७१, इतर भागातील २१ कामगार. 
* उपाहारगृहात २० जण बसतील एवढ्या जागेत शंभराहून अधिक जण थांबणे प्रसाराला ठरले कारणीभूत. 
* ३१३ कोरोनाबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू. १५८ जणांना घरी पाठविण्यात आले असून, १४७ रुग्ण उपचार घेताहेत. 
* कोविड केअर सेंटरमध्ये ७०, हॉटेलमध्ये ४३ आणि १६ जण घरगुती उपचार घेत आहेत. 
* आदिवासी बांधवांमध्ये अजूनही भीती आहे. ती दूर करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची आवश्‍यकता अधिक. 
* वाडीवऱ्हे, गोंदे, गरुडेश्‍वर या पट्ट्यावर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केलेय. 
* तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५ पर्यंत कमी होईल. 

दिंडोरी : 
* नाशिक बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाने गाठले. 
* दिंडोरीमधील दुकानदाराच्या कुटुंबातील पाच, लग्नाशी निगडित १४, तर मोहाडीत एकाच घरातील १३ रुग्ण आढळले. 
* कंपनीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर कामगारांचे एक्स-रे करून घेतले. त्यात एक संशयित आढळला. त्याच्यापासून पाच जणांना लागण. 
* विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रांत संदीप आहेर, सभापती कामिनीताई चारोस्कर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी सरपंचांशी साधला संवाद. 
* १५१ कोरोनाबाधितांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून, १०४ जणांना घरी सोडण्यात आले, तर सद्यःस्थितीत ३९ रुग्ण उपचार घेताहेत. 
* १६ हून अधिक गावांमध्ये कोरोनामुक्तीनंतर पुन्हा रुग्ण आढळलेले नाहीत. 
* कोरोना उपाययोजनांमध्ये असहकार्याबद्दल दोन खासगी डॉक्टरांना नोटीस देत त्यांचे दवाखाने आठ दिवस बंद ठेवण्यात आले होते. 


नाशिक शहरालगतच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वावी, पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील कंटेन्मेंट झोनच्या ठिकाणी भेटी दिल्या. तेथील सुविधांचा आढावा घेत संबंधितांना आवश्‍यक सूचना दिल्या. -लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक  
 

स्टोरी - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com