esakal | #Lockdown : लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!
sakal

बोलून बातमी शोधा

contener.jpg

पप्पू अब्दुल खान (वय 27, रा. भिवंडी, ठाणे, मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्र्यंबकेश्‍वर-सातपूर रोडवरील पिंपळगाव बहुला येथे पोलिसांच्या तपासणी नाक्‍यावर मंगळवारी पहाटे एक संशयास्पद कंटेनर आढळून आला. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता,

#Lockdown : लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाउन काळात 49 जणांना घेऊन जाणारा कंटेनर मंगळवारी (ता. 31) पहाटे सातपूर पोलिसांनी अडविला असता, त्यामध्ये 49 परप्रांतीय नागरिक उत्तर प्रदेशाकडे प्रवास करीत होते. या प्रकरणी कंटेनर जप्त केला असून, चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा घडला प्रकार...
पप्पू अब्दुल खान (वय 27, रा. भिवंडी, ठाणे, मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्र्यंबकेश्‍वर-सातपूर रोडवरील पिंपळगाव बहुला येथे पोलिसांच्या तपासणी नाक्‍यावर मंगळवारी पहाटे एक संशयास्पद कंटेनर आढळून आला. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता, त्यामध्ये 49 पुत्रुष लपून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. हे सर्वजण भिवंडी, मुंबई येथून उत्तर प्रदेशकडे जात होते. या सर्वांची रवानगी सातपूर, स्वारबाबानगर येथील मनपा शाळेत उभारण्यात आलेल्या निवारा शेडमध्ये करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राकेश हांडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

हेही वाचा >होम क्वारंटाईन झालेले बच्चू कडू म्हणतात.. "भावांनो हात जोडतो, घरीच थांबा" बाहेर पडू नका