#Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

doctor helped pregnent woman.png
doctor helped pregnent woman.png

नाशिक : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी व प्रत्येकाने घरातच राहण्याच्या सुचनेमुळे ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. इगतपुरी तालुक्‍यातील दुगाव (नाशिक) येथे घरातच अडकून पडलेल्या गर्भवती महिलेच्या कुटुंबापुढे अशी समस्या निर्माण झाली. हे समजल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. झाकीर शेख यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन तिला आपल्या स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात आणले. तिचे सुरक्षीत बाळंतपण केले. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याने या महिलेच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.


गर्भवती महिलेला स्वतःच्या वाहनातून दवाखान्यात नेत अॅडमिट केले

कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेऊ बघत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये जीवनावश्‍यक वस्तू व आरोग्य सुविधांना यातून सूट देण्यात आली असली तरी त्या पुरवण्यासाठी प्रशासनाबरोबर अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे झाले बघायला मिळत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व ममता नर्सिंग होमचे संचालक डॉ झाकीर शेख हे होय. 22 मार्चपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवांसाठी पूर्णवेळ सुरू ठेवली आहे. दुगाव येथील रोहिदास वाघ यांच्या कन्या ह्या गर्भवती होत्या. ह्या आठवड्यात त्यांच्या कन्येला महिने पूर्ण झाले अन अचानक त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉ झाकीर शेख यांना संपर्क साधला. डॉ झाकीर शेख यांनी वाघ यांना दिलासा देत गर्भवती महिलेला स्वतःच्या वाहनातून दुगाव येथून दवाखान्यात नेत अॅडमिट करून घेतले. आज बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.

इगतपुरी तालुक्‍यातील शुभांगी राहुल खोरे ह्यांना देखील अशाच प्रकारे त्रास सुरू झाला असता डॉ शेख यांनी त्यांच्या स्थानीक कार्यकर्त्यांना सांगून दवाखान्यात दाखल करून घेतले. त्यांचे देखील बाळंतपण सुखरूप त्यांनी करून घेतले. बाळंतपण झाल्यावर त्यांनी त्या महिलेला स्वतःच्या गाडीत पुन्हा इगतपुरी येथे पोहोचते केले. आज नाशिक मधील देखील अनेक रुग्णांना ते वैद्यकीय सेवा ते देत आहेत. अनेक गर्भवती महिलांचे बाळंतपण त्यांनी केले आहे. यामध्ये त्यांना प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ विक्रम पडोळ, भुलतज्ञ डॉ भूषण लोहकरे, बालरोगतज्ज्ञ डॉ अमोल मुरकुटे, डॉ प्रशांत बिर्ला तसेच त्यांच्या दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com