esakal | नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon crime 123.png

नवविवाहितेला शबानाच्या घरी राहण्यास सांगितले. शबानाने तिला मारहाण व छळ केला. इम्रानचा विवाह झाल्याचेही सांगितले. माहेरकडील नातेवाइकांशी संपर्क होऊ दिला नाही. फोन केल्यास ठार करण्याचा दम दिला. अज्ञातस्थळी नेऊन तिच्या दुसऱ्या विवाहाची तयारी केली.

नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परभणी येथील 20 वर्षीय तरुणीशी पहिली पत्नी असताना, निकाह करून फसवणूक करणाऱ्या रमजानपुरा भागातील इम्रान शेख आबीद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित शबाना नूरअली शाह ऊर्फ शब्बो डॉलर (रा. सलीमनगर) हिची पोलिस चौकशी करीत आहेत. मंगळवारी (ता. 11) अटकेचे सोपस्कार पार पडल्यानंतर दोघा संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येईल. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

इम्रानने परभणीच्या तरुणीची फसवणूक करून तिला म्हाळदे शिवारातील फ्लॅटमध्ये बांधून जबरदस्ती तलाकच्या कागदावर सह्या घेतल्या. दुसरा निकाह लावून मुंबईत विकण्याचा डाव असताना, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला शोधल्याने या प्रकाराचा भांडाफोड झाला. यामुळे इम्रान व शबानाची काळी कृत्ये उजेडात आली. परभणीच्या अजीजनगरातील तरुणीचा विवाह इम्रानशी 31 जानेवारी 2020 ला झाला. इम्रानला पत्नी व दोन मुले असताना, त्याने निकाह करून या तरुणीची फसवणूक केली. मात्र, मला काम असल्याचे सांगून तो फरारी झाला व नवविवाहितेला शबानाच्या घरी राहण्यास सांगितले. शबानाने तिला मारहाण व छळ केला. इम्रानचा विवाह झाल्याचेही सांगितले. माहेरकडील नातेवाइकांशी संपर्क होऊ दिला नाही. फोन केल्यास ठार करण्याचा दम दिला. अज्ञातस्थळी नेऊन तिच्या दुसऱ्या विवाहाची तयारी केली. मुलीशी संपर्क न झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता, म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत ती डांबलेली आढळून आली.

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

पोलीसांकडून अधिक तपास...

नातेवाइकांनी सुटका करीत रमजानपुरा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार दिली. अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक बाळासाहेब थोरात तपास करीत आहेत. या दोघा संशयितांनी आणखी काहींची फसवणूक केली की काय, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

go to top