माणुसकीही गहिवरली..! कोरोना काळात मृताच्या कुटुंबियांना शक्य नाही झाले...ते शेजारच्यांनी केले..

death body.jpg
death body.jpg

नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटकाळात एखाद्या इमारतीत बाहेरून कुणी आले,तरी त्याच्याकडे संशयाने बघितले जात आहे. सोसायटी, अपार्टमेंटच्या सदस्यांमध्ये त्यामुळे आपसात तणाव निर्माण होऊ लागले आहेत. कुणी कुणाच्या मदतीसाठी धावेल याची अपेक्षाच ठेवणे गैर झाले आहे. मात्र, समाजात अजून माणुसकी अन्‌ शेजारधर्माचे पालन होत असल्याचा प्रत्यय देणारी घटना कॉलेजरोड परीसरात समोर आली. ​
 

कुटुंबियांना येणे शक्‍य नव्हते....

कॉलेज रोड परिसरात राहत असलेल्या 84 वर्षीय वृद्ध महिलेचे कुटुंबीय नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात राहतात. या आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना सहाय्यासाठी घरी दोन परिचारिका तैनात केलेल्या होत्या. वयानुरूप आजींची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांना कळविण्यात आले; परंतु कुटुंबातील अन्य सदस्य आजारपणामुळे पुण्यातील रूग्णालयात दाखल असल्याने, कुणालाही येथे येणे शक्‍य नव्हते. ही बाब लक्षात घेत शेजाऱ्यांनी आजींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, हृदयाशी निगडित त्रास असल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या संदर्भात कुटुंबीयांना कळविल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती सांगत येणे शक्‍य नसल्याचे कळविले. अशा किचकट क्षणी पुढाकार घेत शेजाऱ्यांनीच अन्य काही जणांची मदत घेत आजींवर अंत्यसंस्कार केले. सतेज किटकुले यांनी दु:खाच्या प्रसंगी मदत करताना सामाजिक भान ठेवण्याचा अनोखा संदेश आपल्या कृतीतून दिला. दरम्यान, त्यांना चहा व्यावसायिक, दादा पवार, परिसरातील रिक्षाचालक, श्री. भावसार, श्री. मोरे यांचे सहकार्य लाभले. 

...म्हणून अंत्यविधी करण्याचा निर्णय

वयोवृद्ध आजींना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले. कुटुंबातील सदस्य पुण्यात दवाखान्यात दाखल असल्याने अन्य सदस्यांना नाशिकला येणे सध्याच्या परिस्थितीत शक्‍य नव्हते. वस्तुस्थिती समजल्यानंतर आम्हीच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. -सतेज किटकुले

खऱ्या अर्थाने माणुसकीही गहिवरली.

सध्या कोरोनाच्या संकटकाळात एखाद्या इमारतीत बाहेरून कुणी आले,तरी त्याच्याकडे संशयाने बघितले जात आहे. सोसायटी, अपार्टमेंटच्या सदस्यांमध्ये त्यामुळे आपसात तणाव निर्माण होऊ लागले आहेत. कुणी कुणाच्या मदतीसाठी धावेल याची अपेक्षाच ठेवणे गैर झाले आहे. मात्र, समाजात अजून माणुसकी अन्‌ शेजारधर्माचे पालन होत असल्याचा प्रत्यय देणारी घटना कॉलेजरोड परीसरात समोर आली. एका वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापासून अंत्यविधीपर्यंतचे सर्वच सोपस्कार पार पाडण्यासाठी शेजाऱ्यांनी केलेली धडपड पाहून खऱ्या अर्थाने माणुसकीही गहिवरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com