तिरंग्याच्या मानसन्मानात शासकीय इतमामात मोरावर अंत्यसंस्कार; वाचा सविस्तर

pimplagaon
pimplagaon

नाशिक / पिंपळगाव बसवंत : येथील शासकीय रोपवाटिकेत वीजेच्या धक्क्याने गुरूवारी (ता.६) मोराचा मृत्यू झाला. राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला ओळख असल्याने वन विभागाकडून तिरंगा झेंड्यात व शासकीय इतमामात या मोरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिरंग्याच्या मानसन्मानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पिंपळगाव बसवंत परिसरातील शासकीय रोपवाटिका परिसरात गुरुवारी (ता. ६) सकाळच्या प्रसन्न वातावरणात थुई थुई करत पिसारा फुलवत मोर नाचत होता. याचदरम्यान मोराच्या पिसाऱ्याचा स्पर्श वीजवाहक तारेला झाला आणि विजेच्या धक्क्याने मोर गंभीर जखमी झाला. मोर जखमी झाल्याचे पशु-पक्षीप्रेमी बाळासाहेब आंबेकर व स्वप्नील देवरे यांना समजताच त्यांनी वडनेर विभागाच्या वन विभागाला घटनेची माहिती तत्काळ कळविली.

पिंपळगावला मोराचा मृत्यू
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जखमी मोराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी अल्पेश चौधरी यांनी मोरास तपासून मृत घोषित केले. मोर राष्ट्रीय पक्षी असल्याने तिरंगा झेंड्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वन विभागाचे अधिकारी देवीदास चौधरी, वाल्मीक निरभवणे, वसंत देवरे, नीलेश गाईखे, सुनील महाले, कुणाल धनवटे आदी उपस्थित होते.

रिपोर्टदीपक अहिरे 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com