'भाऊंचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सॅनिटायझरचा फवारा!'...सोशल मीडियावर यमकदार चारोळ्यांच्या लेप...

fb.jpg
fb.jpg

नाशिक : (दहीवड) कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात घरात बंदिस्त राहून रोज नवीन काय करायचे? असा प्रश्न अनेकांपुढे आहे. सध्या पूर्णवेळ सोशल साईट्स वर नेटीझन्स वावरत असल्याचे चित्र आहे. या लॉकडाऊनच्या काळात युवक - युवतींच्या नजरा फेसबुककडे वळल्या आहे. या मध्ये आपल्या फेसबुक वरील मित्रांच्या अल्बम गॅलरीतील जुन्या फोटोना शोधून त्यावर कमेंट्स करण्याचा कल सुरू झाला आहे. या कमेंट्स आता नाईस, व्हेरीनाईस, कडक या शब्दांची जागा आता गमतीदार फिशपाँड व यमकदार चारोळ्यांनी घेतली आहे.

फेसबुकवर एक नवीनच ट्रेंड

मुलांच्या फोटोवर भाऊ आणि मुलीच्या फोटोवर ताई जोडून या कमेंट्स केल्या जात आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाउनची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी ही घोषणा केली आहे. या घोषणेला ९ दिवस पूर्ण झाले आहेत. अजून निर्धारित कालावधीत लॉकडाउन सुरु राहणार आहेत. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कंपन्या, शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचारी घरुन काम करीत आहे. त्यामुळे आता अनेकांनी घरातच राहणं पसंत केले आहे. तरुणांना घरात बसून काय करावं हे सुचनेसं झालयं आहे. त्यामुळेच आता फेसबुकवर एक नवीनच ट्रेंड पहायला मिळत आहे. 

मकदार चारोळी तयार करणारी तरुणाई जुन्या आठवणींना उजाळा

यामध्ये  मित्राच्या किंवा मैत्रिणीचा काही वर्षांपूर्वीचा फोटो शोधून त्यावर यमक जुळवणाऱ्या विनोदी, भन्नाट कमेंट केल्या जात आहेत तर कुठे फिशपाँड टाकला जात आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तरुण तरुणानी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. त्यामुळे अगदी सुरवातीपासून ते आतापर्यंत फेसबुकवर शेअर केले फोटो शोधून त्यावर रंगतदार विनोदी कमेंट टाकत आहेत.  जुने फोटो फेसबुकवर टाइमलाइनवर अचानक झळकू लागले आहेत. होम क्वारंटाइनच्या काळात दररोज काहीना काहीतरी नवीन यमकदार चारोळी तयार करणारी तरुणाई जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यात रमताना दिसत आहे. 

अशा आहेत विनोदी कमेंट्स आणि फिशपाँड

◆आला वारा गेला वारा, 

भाऊंचा फोटो म्हणजे कोरोना मध्ये सॅनिटायझरचा फवारा..

◆ गावराण तुपात बनवला हलवा..सर्व गांवभर भाऊचाच जलवा.

◆ अगरबत्तीचा होतो धूररररररर

 आणि भाऊनी फोटो टाकला की

पोरी म्हणतात मला घेवून चल भूररर भुररर..

◆ हिची पोझ पाहुन पोर आले धाऊन....

म्हनुणच की काय सरकार ने केलं २१ दिवस लॉकडाऊन 

◆ फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला

फेअर अँड लव्हली कशाला..

◆ लग्नामधला आमिर आणि शोले मधला गब्बर 

फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात, मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर 

◆गव्हाचे पोते सुई ने उसवले...भाऊनी किती तरी जणींना पावडर लावुन फसवले....
◆ तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात प्लिज एक सेल्फी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com