esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

SN120A00228_pr[1].jpg

पालिका प्रशासनाच्या या गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची गोची झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, नियमित कर भरणाऱ्या शहरवासीयांनी मात्र, या उपक्रमाचे स्वागत केले. मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालिकेचे वसुली निरीक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे.

गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची गोची!...घरांसमोर जाऊन ढोल-ताशा, बॅंड अन् भोंगा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सटाणा) सलग तीन वर्षांपासून 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक करवसुली करणाऱ्या येथील सटाणा पालिका प्रशासनाने या वर्षी 95 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या वसुली पथकाने गेल्या काही वर्षांपासून कर चुकविणाऱ्या शहरातील निवडक मालमत्ताधारकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या घरांसमोर जाऊन ढोल-ताशा, बॅंड व भोंगा वाजवून करवसुली सुरू केली आहे. 

गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची गोची

पालिका प्रशासनाच्या या गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची गोची झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, नियमित कर भरणाऱ्या शहरवासीयांनी मात्र, या उपक्रमाचे स्वागत केले. मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालिकेचे वसुली निरीक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात सर्व क्षेत्रांचे क्षेत्रप्रमुख व त्यांचे सहाय्यक यांच्यासह महिला कर्मचारी व नळजोडणी खंडित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

थकबाकीदारांनी वेळेत कर भरणा करून कटू प्रसंग टाळावा

सोमवार (ता.10) पासून प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेद्वारे थकबाकी दारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजविल्यामुळे व अप्रत्यक्षपणे थकबाकीदारांना टार्गेट केले जात असल्याने वसुलीचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या थकबाकीदारांना जाग आण ण्यासाठी पालिका प्रशासनाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या पथकामार्फत थकबाकीदारांच्या नळजोडण्याही खंडित केल्या जात असून, मोठ्या प्रमाणात बाकी असणाऱ्यांवर जप्तीचे वॉरंट बजावण्यात येत आहेत. कितीही कालावधी उलटला तरी व्याजासह कराचा भरणा टाळता येणार नसल्याने थकबाकीदारांनी वेळेत कर भरणा करून कटू प्रसंग टाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती डगळे यांनी केले आहे. 

हेही वाचा > नाशिकमध्ये शनिवारी राज्य वकील परिषद...सरन्यायाधीश बोबडे व मुख्यमंत्री यांची उपस्थिती 

तत्काळ बंद करून मालमत्तादेखील जप्त केल्या जातील

वसुली पथकाद्वारे बॅंड, भोंगे तसेच ढोल-ताशा बडवून प्रत्यक्ष कर भरणा होत नाही तोपर्यंत दररोज एकवेळेस थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर हा वाद्यवादनाचा 
प्रकार सुरूच ठेवला जाईल. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर थेट पालिकेच्या वसुली विभागात येऊन करभरणा केला नाही, तर त्यांच्या नळजोडण्या तत्काळ बंद करून मालमत्तादेखील जप्त केल्या जातील. - हेमलता डगळे, मुख्या धिकारी, सटाणा  

हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!

go to top