गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!

सागर कैलास पवार.jpg
सागर कैलास पवार.jpg

नाशिक : (देवळा) वेळ कधीही सांगून येत नाही हेच खरे... त्यातल्या त्यात अनपेक्षितपणे वाईट घडणाऱ्या घटना अवघे आयुष्यच बदलून टाकतात. असाच प्रकार देवळा येथील आंबेडकर नगर परिसरात जुन्या घराच्या मातीची भिंत अंगावर पडल्याने त्याखाली दबून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.  

अशी घडली घटना

शहरातील आंबेडकरनगर परिसरात जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी त्यावरील पत्रे काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सागर कैलास पवार या 22 वर्षीय मदत करत 
असतांना अचानक तेथील मातीची भिंत अंगावर पडल्याने त्याखाली दबून तो गंभीर जखमी झाला. सागर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. पुढील उपचारा साठी सटाणा येथे नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला. गेला होता घर सावरायला परंतू, काळाचा असा घाला झाला की त्याला प्राण गमवावे लागले. त्याच्या अशा अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. आरपीआय (आठवले गट)चे तालुकाध्यक्ष कैलास पवार यांचा तो मुलगा होय.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com