CoronaEffect : कोरोनो थंड झाल्याशिवाय ग्रामपंचायतींच्या निवडणुका काय होईना..!

grampanchayt elections.jpg
grampanchayt elections.jpg

नाशिक : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील १०२, तर येवला तालुक्‍यातील २५ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित केल्या आहेत. आता छाननी, माघार, मतदान व मतमोजणी कोरोनो थंड झाल्यावरच घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे गावोगावी तापलेले वातावरण थंडावले आहे. राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी (ता.१७) याबाबत परिपत्रक जारी केले. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांशी संबंधित प्रभागरचना, मतदारयादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी सर्व कार्यक्रम आहे, त्या टप्प्यावर स्थगित केले आहेत.

गल्लो-गल्ली पार्ट्या अन्‌ राजकारणाचे फड रंगात येतच होते मात्र....सगळ्यावरच पाणी!

राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५७०  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात कळवणमधील २९, येवल्यातील २५, इगतपुरीच्या चार व दिंडोरीच्या ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. १७) अर्जांची छाननी, तर गुरुवारी (ता.१९) दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ३१ मार्चला मतदान व १ एप्रिलला मतमोजणी होणार होती. 

दीड हजाराहून अधिक निवडणूका स्थगित

ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे नेतृत्वाची प्राथमिक शाळा. विधानसभा, लोकसभेच्या निवडमूका सोप्या. मात्र गल्ली व भावकीतील मतदारांच्या ग्रामपंचायत निवडणूका अवघड. या अवघड निवडणूकांचे अर्ज दाखल करुन गल्लो-गल्ली पार्ट्या अन्‌ राजकारणाचे फड रंगात येतच होते. मात्र कोरोनामुळे राज्य सरकारने राज्यातील दीड हजाराहून अधिक निवडणूका स्थगित केल्या. त्यामुळे राजकारणाच्या प्राथमिक शाळेलाही टाळे लागले आहे. पण या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही संदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश देण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे गावोगावी होणाऱ्या बैठका, चर्चा, प्रचारसभांना होणारी गर्दी आपसूकच टळणार आहे. मात्र, अर्ज दाखल झाल्याने मोठा कालावधी मिळणार असून, माघारी व फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com