संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुम्ही ऐकलतं का?...अभिनेता सोनू सूदच्या पाठीशी भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन हे खंबीरपणे उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी मदत केली. मग सोनू सूदने मदत केली यात चुकीचे काय?, त्यात वावगे काय? असे प्रश्‍न उपस्थित करत महाजन यांनी "आम्ही काय करणार नाही हे योग्य नाही', अशा शब्दांमध्ये सरकारवर तुटून पडलेत...

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुम्ही ऐकलतं का?...अभिनेता सोनू सूदच्या पाठीशी भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन हे खंबीरपणे उभे आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी मदत केली. मग सोनू सूदने मदत केली यात चुकीचे काय?, त्यात वावगे काय? असे प्रश्‍न उपस्थित करत महाजन यांनी "आम्ही काय करणार नाही हे योग्य नाही', अशा शब्दांमध्ये सरकारवर तुटून पडलेत...

मजूर घरवापसीची रोड स्टोरी अन् त्यात सोनू सूदची झाली एंन्ट्री

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन नशिबी आल्यामुळे, परप्रांतीय मजुरांनी स्थलांतराला सुरुवात केली तेव्हा घरी जाण्यास वाहनांची व्यवस्था होत नसेल तर पायी चालत ते घरचा रस्ता धरत होते. मात्र अशा सर्व गरजू मजुरांच्या मदतीला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद धावून आला. कोणाला टोल फ्री नंबरवरुन तर कोणाला व्टिटरवरुन मदतीचा हात दिला. मात्र यावरुन चांगलेच राजकारणात मत मतांतराचे पडसाद उमटतांना दिसून येत आहेत. 

हेही वाचा > जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे होत्याचे नव्हते!...वाचा सविस्तर

चांगलाच संघर्ष रंगलायं

"सामना'मधील "रोखठोक'मध्ये "एकटा सोनू सूद खरा!' अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी फटकेबाजी केली. सोनू यांचा महात्मा असा उपरोधिक उल्लेख करत झपाट्याने आणि शिताफीने महात्मा बनवले जाते असे सांगत राऊत यांनी राज्यपालांनी महात्मा सूदला शाबासकी दिल्याचा टोला लगावलाय. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोचवल्याच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगलायं. त्याच्या पुढील अंकाचा पडदा नाशिकमध्ये उलगडला गेला. गिरीश महाजन यांनी पेटलेल्या वाक्‌युद्धाच्या आगीत तेल ओतले. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan stands firmly behind Sonu Sood nashik marathi news