मन हेलावणारी घटना! दहावीतल्या विद्यार्थीनीने धरला आधार आश्रमाचा रस्ता; चिठ्ठीच्या आधारे खुलासा

सतीश निकुंभ
Tuesday, 6 October 2020

औद्योगिक वसाहतीतील कामगार वस्त्यात हीच गंभीर समस्या समोर येते आहे. अशाच एका कुटुंबातील एका मुलीने घरातून बाहेर पडत आधार आश्रमाचा रस्ता धरला. इकडे आई वडील यांनी मुलगी घरातुन निघून गेल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर...

नाशिक / सातपूर : औद्योगिक वसाहतीतील कामगार वस्त्यात हीच गंभीर समस्या समोर येते आहे. अशाच एका कुटुंबातील एका मुलीने घरातून बाहेर पडत आधार आश्रमाचा रस्ता धरला. इकडे आई वडील यांनी मुलगी घरातुन निघून गेल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर...

लॉकडाउनचा परिणाम : कौटुंबिक वाद सुरू

लॉकडाउनमध्ये कामगार कुटुंबाची वाताहात झाली आहे. हळूहळू औद्योगिक वसाहतीत यंत्राचा खडखडाट सुरू झाला असला तीन ऐवजी एका पाळीत काम सुरु झाले आहे. बहुतांश कंपन्यांनी लॉकडाउन ही संधी साधून कामगारांना कमी केल्याचे समोर आले आहे. अनेक कामगारांच्या कुटूंबात आर्थिक संकटातून कौटुंबिक वाद सुरू झाले आहेत.

मुलीने धरला रस्त्यावरील आधार आश्रमाचा रस्ता

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगार वस्त्यात हीच गंभीर समस्या समोर येते आहे. अशाच एका कुटुंबात आई व मुलीत वाद झाल्यानंतर मुलीने घरातून बाहेर पडत त्रंबकेश्‍वर रस्त्यावरील आधार आश्रमाचा रस्ता धरला. इकडे आई वडील यांनी मुलगी घरातुन निघून गेल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. सातपूरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरूच झाला. मात्र तिच्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी आश्रमात चौकशी केली असता मुलगी त्या आश्रमात सापडली. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

त्र्यंबकेश्‍वरच्या आश्रमात मिळाल्याची धक्कादायक घटना

लॉकडाउनमुळे अनेक कामगारांना नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यांच्या कामगारांच्या घरात आर्थिक अडचणतून कलह वाढले आहेत. अशा वादाला कंटाळून श्रमिकनगर नगर येथील दहावीत शिकणारी मुलगी घरातुन निघून थेट त्र्यंबकेश्‍वरच्या आश्रमात मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

आर्थिक विवंचनेतून घरोघरी कौटुंबिक वाद
कामगार लोकवस्ती दहा बाय दहाच्या खोलीत आई-वडील मुलं असा चौकोनी आहे. घरात जागा नसल्याने स्थानीक मुल मुली कामगार लोकवस्तीतील अभ्यासिकेत वेळ घालवत होते. पण सद्या शाळा व महाविद्यालय बरोबर आभ्यासिका ही बंद आर्थिक विवंचनेतून घरोघर कौटुंबिक वाद वाढले आहेत.

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl found in Aadhar Ashram trimbkeshawar nashik marathi news