काय सांगता..! तोळाभर सोन्यासाठी मोजावे  लागणार चक्क 'इतके' रुपये 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर इतर गुंतवणुकीचे मूल्य कमी होत असताना सोन्यामधील गुंतवणुकीला मोठे महत्त्व आले आहे. एरवी लग्नसराईत सोन्याच्या भावाला तेजी असते. परंतु सध्या लग्नसराई संपूनही सोन्याच्या दराचा आलेख टिकून आहे. गुंतवणुकीपेक्षा सोन्यातील परतावा अधिक असल्यामुळे मंदीच्या काळातही सोन्याची झळाळी अद्यापही टिकून आहे. 

नाशिक : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर इतर गुंतवणुकीचे मूल्य कमी होत असताना सोन्यामधील गुंतवणुकीला मोठे महत्त्व आले आहे. एरवी लग्नसराईत सोन्याच्या भावाला तेजी असते. परंतु सध्या लग्नसराई संपूनही सोन्याच्या दराचा आलेख टिकून आहे. गुंतवणुकीपेक्षा सोन्यातील परतावा अधिक असल्यामुळे मंदीच्या काळातही सोन्याची झळाळी अद्यापही टिकून आहे. 

तोळाभर सोन्यासाठी मोजावे लागणार ५१ हजार रुपये 

काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने तेजी सुरू आहे. लॉकडाउनच्या मंदीच्या काळात सोने थेट ५१ हजारांपर्यंत पोहोचले आहे. शंभर वर्षांपूर्वी हेच सोने ९० रुपये होते हे सांगूनही आजच्या पिढीचा विश्‍वास बसणार नाही. विशेष म्हणजे तेव्हा १२ ग्रॅमचा तोळा आज दहा ग्रॅमचा झाला आहे. म्हणजे दोन ग्रॅम वजन कमी झाले आहे.

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold will cost Rs fifty one thousand nashik marathi news